Adah Sharma Announce Break Esakal
मनोरंजन

Adah Sharma: केरळ स्टोरीच्या अदानं घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना बसला धक्का...

अदा शर्माला काही दिवसांपुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर, तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट पोस्ट केली आहे ज्यात तिने ती चित्रपटांमधून ब्रेक घेत असल्याचे म्हटले आहे.

Vaishali Patil

Adah Sharma Announce Break: 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अदा शर्माची प्रकृती बिघडली आहे. काही दिवसांपुर्वीच तिला अचानक तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अदा शर्माला फूड अॅलर्जी झाली होती. तिला डायरियाची समस्या होती. मात्र आता तिने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं तिच्या चाहत्यांना तिची काळजी लागली होती. आता अदानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं आता काही दिवस कामातुन ब्रेक घेणार असल्याचं सागितलं. तिला पित्ताची समस्या उद्धभवल्यामुळे तिला अस्वस्थ वाटतं होतं. औषधांच्या परिणाम तिच्या त्वचेवर झाला आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेयर करत 'ट्रिगर वॉर्निंग: ग्राफिक इमेज अहेड' असं लेबल लावतं तिने काही फोटो शेयर केले आहेत.

कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुमचे सर्वांचे आभार... मला अनेकांचे मॅसेज आले आणि काही लोक जे बऱ्यात वर्षांपासून भेटलेही नाहीत त्यांनीही माझ्या तब्येतीची विचरणा केली. त्वचेवर पुरळ येण्याची भीती वाटत असल्यास स्वाइप करू नका. फोटो थोडी भितीदायक आहेत. पण मला वाटले की फक्त सौंदर्याची फोटो Instagram वर शेअर करू नयेत.'

याच पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले की, 'मी काही दिवसांपासून आजारी आहे. मला पित्ताचा त्रास झाला आहे, पुरळ आल्या आहेत. त्यामुळे ती फुल स्लीव्हज घालून लपवत होती मात्र आता ते तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. यासाठी मी औषध घेतली आणि मला औषधांची ऍलर्जी झाली आहे. खूप उलट्या होत होत्या. त्यामुळे माझी तब्येत अजून बिघडली. त्यामुळे आता दुसरे औषध आणि इंजेक्शन घेऊन उपचार घेत आहे.

'यानंतर मी माझ्या अम्मांना वचन दिले होते की मी माझ्या तब्येतीची काळजी घेईन. त्यामुळे मी काही दिवसांसाठी ब्रेकवर जात आहे. आता तब्येतीकडे लक्ष देत आहे. मी आयुर्वेदिक घेत असून मी लवकरच परत येईल. तोपर्यंत मी इंस्टा वर कमांडोच्या पडद्यामागील सीन शेयर करत राहिलं. अशी माहिती तिने चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

कमांडो ही वेब सीरिज 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'कमांडो' ही वेब सीरिज 'कमांडो' फ्रँचायझीमधील आहे. तिचे चाहते तिच्या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT