The Kerala Story Box Office Collection Day 6 Esakal
मनोरंजन

The Kerala Story BO: वादासोबत भरघोस कमाईदेखील! द केरळ स्टोरी बॉक्स ऑफिसवर लवकरच सेंच्यूरी ठोकणार

Vaishali Patil

सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट 'द केरळ स्टोरी' हा सध्या मनोरंजन विश्वात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता सहा दिवस झाले आहे. या सहा दिवसात या बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.

चित्रपटाचे कलेक्शनचे आकडे पाहता येत्या वीकेंडला 'द केरळ स्टोरी' 1oo कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असा विश्वास सर्वाना वाटत आहे.

निश्चितच या चित्रपटाच्या यशाचं श्रेय त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे.

केरळ स्टोरीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. त्यामुळेच सहाव्या रिलीजमध्येही चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे.

 'द केरळ स्टोरी' ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या 6 दिवशी देखील बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाने बुधवारी चांगलीच उडी घेतली आणि जवळपास 12 कोटींची कमाई केली. मंगळवारपेक्षा त्यात 10% वाढ नोंदवली गेली.

 द केरळ स्टोरीने पहिल्या दिवशी 8.3 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी 11.22 कोटी आणि रविवारी या चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे 16.40 कोटींचा व्यवसाय केला.

सोमवारच्या कमाईच्या आकडे पाहिले असता या चित्रपटाने 10.7 कोटींचा गल्ला जमावला आहे. तर मंगळवारी या चित्रपटाची कमाई 11 कोटींचा जवळपास होता.

तर बुधवारी या चित्रपटाने 12 कोटींची कमाई केली आहे. या बॉक्स ऑफिस कलेक्शनसह, चित्रपटाने आतापर्यंत एकूण 69 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतांनाच दुसरीकडे निर्मात्यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता हा चित्रपट आणखी 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अदा शर्मानं स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT