Adah Sharma The Kerala Story Esakal
मनोरंजन

Adah Sharma: केरळ स्टोरीच्या अदा शर्मानं आलिया अन् कंगनालाही टाकलं मागे! केला नवा विक्रम

Vaishali Patil

सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपट 'द केरळ स्टोरी' हा 5 मे ला रिलिज झाला. आता या चित्रपटाला रिलिज होऊन आठवडा झाला असला तरी तो बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. कमाईचे आकडे पाहता हा चित्रपट वर्षातील ब्लॉकबस्टर हिट ठरला आहे.

एकीकडे मध्यप्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त आला असताना दुसरीकडे काही राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

द केरळ स्टोरीबद्दल सांगायचं झाला तर हा चित्रपट 3 महिलांवर आधारित आहे. 'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.

या चित्रपटात कशा प्रकारे धर्माच्या नावावर त्याचं ब्रेन वॉश करण्यात येत आणि त्याचं धर्मपरिवर्तन करण्यात येते. या चित्रपटात अदा शर्मानं शालिनीची भुमिका अत्यंत दमदार पद्धतिने साकरलेली आहे.जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम करत

आहे. तर आता अदा शर्माने देखील नवा विक्रम तिच्या नावे केला आहे. अदा शर्माचा चित्रपट 'द केरळ स्टोरी'ने पहिल्या आठवड्यातील कमाईच्या बाबतीत आलिया भट्टचा चित्रपट गंगूबाई काठियावाडीलाही मागं टाकलं आहे. आता द केरळ स्टोरी हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा महिला अभिनेत्रीचा चित्रपट ठरला आहे.

'द केरळ स्टोरी' च्या कमाईच्या आकड्याबद्दल बोलायचं झाल्यास याचित्रपटाने 7 दिवसांत 81.36 कोटी कमावले. अशा प्रकारे या चित्रपटाने आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठीवाडी'ला मागे टाकलं आहे.

आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई केलेला महिला केंद्रित चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला त्याच्या कथेमुळे आणि वादामुळे प्रसिद्धी मिळाली, ज्याचा फायदा चित्रपटाला कलेक्शमध्ये नक्कीच झालेला दिसत आहे.

बॉलीवूडच्या 5 सर्वात मोठ्या महिला-केंद्रित चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर अदा शर्माचा चित्रपट The Kerala Story याने पहिलं स्थान गाठलं आहे. पहिल्या आठवड्याच्या कमाईच्या बाबतीत केरळ स्टोरीने आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीला मागे टाकलं त्या चित्रपटानं ६८.८२ कोटींची कमाई केली होती.

तर दुसरीकडे, कंगना राणौतच्या मणिकर्णिका या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 61.15 कोटींची कमाई केली आहे. करीना कपूरच्या 'वीरे दी वेडिंग'ने 56.96 कोटी तर आलियाच्या 'राझी'ने 56.59 कोटींची कमाई केली. त्यामुळे आता अदा शर्मानं यादित तिचं नावं कोरलं आहे.

'द केरळ स्टोरी'ने शुक्रवारी रविवारचा कलेक्शन वगळता इतर दिवसांपेक्षा आठव्या दिवशी अधिक कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 12.50 कोटींची कमाई केली आहे.

म्हणजेच संपूर्ण आठ दिवसांत या चित्रपटाने 93.86 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

SCROLL FOR NEXT