Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: 'ती मार खाईल असं वाटतं का?', राखीच्या आरोपांवर आदिलच्या वकिलानं काढली कुंडली

सकाळ डिजिटल टीम

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. घरातील वाद आता मिडिया आणि कोर्टा पर्यंत पोहोचला आहे. राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने तिच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

राखीने आदिलवर मारहाण, फसवणूक, विवाहबाह्य संबंध इतकच नाही तर त्याच्यावर बलात्कारासारखे अनेक गंभीर आरोप केले होते. आदिल पोलिस कोठडीत आहे, दरम्यान, राखीच्या आरोपांवर त्याच्या वकिलाने वक्तव्य केले आहे.

राखी सावंतच्या आरोपांवर आणि वक्तव्यांवर आदिलच्या वकिलाने प्रथमच विधान केले आहे. आदिलचा वकील म्हणतात, “हे सर्व पूर्वनियोजित होतं. आरोप निराधार आहेत. राखी इतकी कमजोर आहे की तिला कोणीही मारु शकतं आणि ती काहीही न बोलता ते सहन करेल असं तुम्हाला वाटते का?

आदिल चांगल्या कुटुंबातील असून त्याला राखीकडून पैसे घेण्याची किंवा व्हिडिओ शूट करण्याची गरज नाही. विभक्त झाल्यानंतर राखीने पहिल्या पतीकडून पैसे घेतले होते आणि आता ती आदिलसोबतही तेच करत आहे. बँकेच्या स्टेटमेंटसह सर्व पुरावे मी न्यायालयात सादर केले आहेत.

तर दुसरीकडे राखी सावंत म्हणते की, तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत. याचा तिला खूप त्रास होत आहे. राखीने 29 मे 2022 रोजी आदिलशी लग्न केल्याचं सांगितलं होते आणि तेव्हापासून आदिल तिला नेहमी मारहाण करत असे.राखी सावंत अनेकदा मीडियासमोर येऊन तिचा पती आदिल खान दुर्रानी आणि तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी बोलली आहे.

तिने आदिलवर दुसरे लग्न केले. अफेअरचाही आरोप. याशिवाय राखीने असाही दावा केला आहे की, आदिल आधीच विवाहित आहे. आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आदिलला जामीन मिळतो की नाही हे पाहावे लागेल लवकरच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘खेलो इंडिया’ची सुवर्णपदक विजेती आता हवाई दलात ‘फ्लाइंग ऑफिसर’! ‘एएफएमसी’तील तरुणींचा प्रेरणादायी प्रवास

Police Housing: मुंबई पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार! 74 भूखंडांवर नवे गृहनिर्माण प्रकल्प उभारणार; सरकारची मोठी घोषणा

Mangalwedha News : उजनी उजवा व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे; भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

Palkhi Sohala : पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर सज्ज!; १५ हजार चौ. फूटांचे जर्मन हॅगर, मोबाईल चार्जिंगपासून महिला वारकऱ्यांसाठी बंदिस्त स्नानगृहापर्यंत सर्व सुविधा

स्मार्ट मीटरमुळे नाही, हिटवेव्हमुळे वीज बील वाढलं; मुख्यमंत्री फडणवीसांनी आकडेवारीच सांगितली

SCROLL FOR NEXT