Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: ती बिनडोक बाई! राखी सावंतच्या गंभीर आरोपांनंतर आदिलची प्रतिक्रिया, म्हणाला, 'घरचं'

सकाळ डिजिटल टीम

राखी सांवतही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तिला उगाच ड्रामा क्वीन म्हणतं नाहीत. ती नेहमी असं काहीतरी करते की नेटकरी त्याला ड्रामाच म्हणतात. ती सध्या तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या आईचे निधन झाले. तिची आई ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होती. आता तिच्या लग्नामुळे तिला ट्रोल केलं जातयं. तिने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता त्यातच आदिलने तिच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सांवतच्या आयूष्यात कोणतीच गोष्ट सहज घडत नाही त्याविषयी मोठा ड्रामा केल्या शिवाय त्या गोष्टीचा आनंदच राखीला नसतो असं काहीतरी तिच्याबद्दल बोलवं लागेल. आधी तिच्या लग्नाचा तुफान ड्रामा झाला.

तिने लग्नाचे फोटो व्हायरल केले आणि त्यानंतर आदीलनं लग्न मान्य करण्यास वेळ घेतला. त्यावेळीही राखीनं मिडियासमोर तुफान राडा केला. तिने आदीलवर अनेक आरोप लावले मात्र काही दिवसांनी आदिलनं ते लग्न मान्य केलं . त्यानंतर ती पुन्हा त्याच्यासोबत राहायला लागली आणि त्याच्याबद्दल मिडियामध्ये चांगल बोलू लागली.

मात्र आता पुन्हा तिच्यात आणि आदिलमध्ये काहीतरी बिनसलं. पुन्हा तिने मिडियासमोर येत आदिलबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत. आदीलने केवळ प्रसिद्धीसाठी तिचा वापर केला. त्याला इडस्ट्रीत यायचं होतं आणि त्यासाठी त्याने मला शिडी बनवलं. तो नेहमी खोटं बोलतो. इतकच नाही तर त्याच दुसऱ्यामुलीसोबत अफेअर सुरु आहे. तो तिची फसवणुक करत आहे. ती दुसरी मुलगी त्याला बॅल्कमेल करत आहे आणि राखीला त्याने तलाक द्यावा असं सांगत असल्याचं ती बोलली.

मात्र आता या सर्वप्रकरणात तिच्यासोबत आदिल नव्हता. त्यामुळे कोणं खरं आणि कोणं खोट? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता त्यातच पहिल्यांदा आदीलनं मिडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा त्याला पापाराझींनी स्पॉट केलं तेव्हा तो खुप खुश दिसतं होता. जणु त्याला राखीने केलेल्या आरोपांचा काही फरकचं पडला नाही.

विरल भयानीने आदिलचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आदिल म्हणाला, “राखीनं घरातील भांडणं घरातच ठेवली पाहिजे.” असं म्हणत आदिलनं या वादावर बोलणं टाळलं आणि तो निघाला.

नेटकऱ्यांनीही राखीला याआधी हाच सल्ला दिला होता की तिने घरातला वाद चव्हाट्यावर आणू नये. तिनं तिच्या नवऱ्यासोबतच भांडण घरातच मिटवावं आणि नेटकऱ्यांना त्रास देणं थांबवाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT