Adinath-Urmila Kothare esakal
मनोरंजन

Adinath-Urmila Kothare : सासऱ्यांनी जुळवून आणलं? आदिनाथ-उर्मिला स्टेजवर एकत्र

मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेचे नाव घेतले जाते.

सकाळ डिजिटल टीम

Adinath Kothare Urmila Kanitkar reletionships gossip : मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेचे नाव घेतले जाते. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील वाद वेगवेगळ्या प्रकारे समोर आले आहे. त्यावर आता पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयानं, दिग्दर्शनानं महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महेश कोठारे यांच्या "डॅम इट आणि बरंच काही" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आदिनाथ कोठारे आणि उर्मिलानं केल्याचे दिसून आले. त्या दोघांनाही स्टेजवर पाहून चाहत्यांना आनंद झाला.

Also Read - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

यासगळ्यात मात्र नेटकरी काही त्यांच्याबाबत चर्चा करण्याचे थांबवत नाही. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. यासगळ्यावर सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आदिनाथचा चंद्रमुखी लोकप्रिय झाला होता. त्यात त्यानं साकारलेला दौलतराव प्रेक्षकांना भावला. याशिवाय त्यानं काही वेबसीरिजमध्ये केलेले काम देखील चाहत्यांना आवडले आहे. उर्मिलाही येत्या काळात वेगळ्या विषयांवरील चित्रपटात दिसणार आहे. अशात त्यांच्या रिलेशनशिपवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांमुळे चाहत्यांना धक्का बसला होता.

यापूर्वी यासगळ्यावर आदिनाथनं प्रतिक्रिया देखील दिली होती. आमच्यात सगळं काही छान चाललं आहे. तेव्हा चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी काळजी करु नये. असे म्हटले होते. आता व्हायरल झालेल्या त्या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Verdict : माधुरी हत्तीचं पुढं काय झालं? अनेकांना प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

‘रंगीला’पुन्हा पडद्यावर! उर्मिला-अमिरचा क्लासिक लव्हस्टोरी परत अनुभवता येणार, 'या' दिवशी रीरिलीज होणार सिनेमा

Guardian Minister Chandrakant Patil: महायुतीचा महापौर होण्यासाठी परिश्रम घ्यावेत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील; आगामी काळात जबाबदाऱ्या मिळतील

Beed Nandanvan Hostel: नंदनवन नव्हे छळछावणी! वसतिगृहात लहानग्यांना धुवायला लावले कपडे | Beed | Sakal News

Birthday Special: बाबो! ललित प्रभाकर आजही व्हॉस्टअ‍ॅप वापरत नाही! ऋता दुर्गुळेनं केला खुलासा... म्हणाली, 'आम्ही बोलताना...'

SCROLL FOR NEXT