Adipurush box office day 4 collection Prabhas film ‘crashes’ on Monday, earns ₹20 cr  SAKAL
मनोरंजन

Adipurush Box Office: आदिपुरुषचा खेळ खल्लास! सोमवारी केली फक्त इतकी कमाई

आदिपुरुष सिनेमाने सोमवारी किती रुपये कमावले याचा बॉक्स ऑफिसवर रिपोर्ट समोर आलाय

Devendra Jadhav

Adipurush 4th Day Box Office News: आदिपुरुष सिनेमा रिलीज होऊन आता ५ दिवस झाले आहेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल याकडे सर्वांचं लक्ष होतं.

पण आता मात्र फासे पलटले आहेत. आदिपुरुष सिनेमा हळूहळू बॉक्स ऑफिसवर शरणागती पत्करतो आहे. आदिपुरुष सिनेमाने सोमवारी किती रुपये कमावले याचा बॉक्स ऑफिसवर रिपोर्ट समोर आलाय.

(Adipurush box office day 4 collection Prabhas film ‘crashes’ on Monday, earns ₹20 cr)

आदिपुरुषच्या पाचव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट:

बघायला गेलं तर.. कोणताही सिनेमा विकेंडला म्हणजेच शुक्रवार ते रविवार चांगली कामगिरी करतो. सोमवारी दैनंदिन दिवसात सिनेमा किती पैसे कमावतो याची खरी कसोटी असते.

आदिपुरुष मात्र या कसोटीवर खरा उतरला नाही. आदिपुरुषने सोमवारी फक्त ₹20 कोटी गोळा केले. त्यामुळे आदिपुरुष थिएटरमधून लवकरच गाशा गुंडाळणार, अशी चिन्हं दिसत आहेत.

आदिपुरुषची बॉक्स ऑफिस आकडेवारी:

Sacnilk मधील अहवालानुसार, वीकेंडमध्ये भारतात ₹ 220 कोटी कमावल्यानंतर आदिपुरुष सिनेमाची सोमवारची कामगिरी सुमार होती. शुक्रवारी 86 कोटी, शनिवारी 65 कोटी आणि रविवारी 69 कोटी कमावले.

आदिपुरुषने जगभरात आजवर ₹340 कोटींची कमाई केली होती. सोमवारची जगभरातील आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोमवारी ‘क्रॅश’ची घोषणा केली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, “नकारात्मक शब्दांचा परिणाम.. जोरदार वीकेंडनंतर, आदिपुरुष सोमवारी कोसळला." असा खुलासा त्यांनी केला

आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांना सुरक्षा:

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाबद्दल बरेच वाद विवाद सुरु आहे. आदिपुरुषमधील संवाद आणि दृश्यांवर प्रेक्षक अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यातच चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर याच्यावर प्रेक्षकांचा जरा जास्तच राग आला आहे. नेटकरी मनोज मुंतशीर यांना सोशल मिडियावर वाईटरित्या ट्रोलही करत आहेत.

दरम्यान, आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. या वादानंतर आपल्याला धोका असल्याचे मनोज मुंतशीर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT