HC reprimands the makers of Adipurush
HC reprimands the makers of Adipurush  esakal
मनोरंजन

Adipurush Controversy : 'लोकांनी फक्त हॉल बंद केले आहेत, ते उद्या काहीही करतील'! कोर्टानं पुन्हा झापलं

युगंधर ताजणे

HC reprimands the makers of Adipurush : प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांचा आदिपुरुष जेवढा लोकप्रिय झाला तेवढ्याच प्रमाणात त्याला टीकेला देखील सामोरं जावं लागलं आहे. रामायणाची मोडतोड केल्याचा आरोप मेकर्सवर अनेकांनी केला आहे. यासगळ्यात उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टानं आदिपुरुषच्या मेकर्सला झापले आहे.

रामायणावर आधारित आदिपुरुषमध्ये ज्या प्रकारे देव देवतांच्या प्रतिमांचे जे चित्रण करण्यात आले आहे ते चूकीचे असल्याचे अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यावरुन भावना दुखावल्या गेल्याचे प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. यासगळ्यात कोर्टानं देखील महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे येत्या काळात देखील आदिपुरुषची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

अलाहाबाद कोर्टानं आदिपुरुष या चित्रपटावर जी याचिका करण्यात आली आहे त्यावर सुनावणी केली आहे. त्यात कोर्टानं मेकर्सनं या चित्रपटामध्ये भगवान राम आणि हनुमान यांचे ज्याप्रकारे चित्रण केले आहे त्यावरुन मेकर्सप्रती नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर काही निरीक्षणंही नोंदवली आहेत. कोर्टानं जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर मेकर्सकडून लेखी स्पष्टीकरणही मागवलं आहे. गेल्या आठवडाभरापासून कोर्टानं मेकर्सला लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

कोर्टानं आदिपुरुषच्या मेकर्सला चांगलेच सुनावले आहे. कोर्ट म्हणाले की, आता लोकांनी फक्त हॉलचे दरवाजे बंद केले आहेत. त्यांनी मनात आणलं तर ते काहीही करतील. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. ते आपल्यासाठी वंदनीय आहे. लाखो लोकांची रामायणावर श्रद्धा आहे. प्रेम आहे. यावेळी कोर्टानं सेन्सॉर बोर्डावर देखील टीका केली असून त्यांना काही प्रश्न केले आहेत. सेन्सॉर बोर्डानं त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नाही. असे कोर्टानं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NDA Government: नवे सरकार मारणार चौकार? पाच वर्षांत NDA घेऊ शकते 'हे' चार मोठे निर्णय

Narendra Modi : १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक जिंकली मात्र, तरूणांच्या लग्नाबाबतची PM मोदींची ती इच्छा अपूर्णच राहीली!

PM Modi oath ceremony : शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Sonam Kapoor: सोनमला वाढदिवशी पतीकडून मिळालं खास गिफ्ट; फोटो शेअर करत म्हणाली...

Manoj Jarange : 'तर विधानसभेला घरी बसतील...'; जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT