Adipurush Controversy sita aka dipika chikhlia said ravana should not look like mughal
Adipurush Controversy sita aka dipika chikhlia said ravana should not look like mughal Google
मनोरंजन

Adipurush: रावणाचा लूक पाहून भडकल्या जुन्या सीतामय्या; म्हणाल्या,'रावण लंकेचा होता तर मग... '

प्रणाली मोरे

Adipurush Controversy: आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यापासून जो -तो त्याच्यावर आपला राग काढताना दिसत आहे. प्रत्येकजण टीझरवर आपलं मत मांडताना दिसत आहे. खासकरुन टीझरमधील व्हीएफक्स आणि त्याच्यातील व्यक्तीरेखांचे लूक्स यावर लोक भयानक संतापलेयत. रामायण ही अशी कथा आहे ज्याच्याशी लोकांची श्रद्धा जोडली गेलीय,आणि असं असताना लोक आदिपुरुषमधील व्यक्तीरेखांशी स्वतःला कनेक्ट करु शकत नाहीयत. यासंदर्भात रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतून सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध झालेल्या दीपिका चिखलिया यांनी एका न्यूज पोर्टलशी बातचीत करताना आदिपुरुषच्या भरकटलेल्या टीझरवर आपलं मत मांडलं आहे. दीपिका म्हणाल्यात,''ज्या व्यक्तीरेखेला आपण पूर्वीपासून जसं पाहत आलोय, त्याचा लूक जसा आहे तसाच वाटायला हवा,तो मुघल वाटला नाही पाहिजे''.(Adipurush Controversy sita aka dipika chikhlia said ravana should not look like mughal)

तसं पाहिलं तर आदिपुरुषमधील सर्वच व्यक्तीरेखांच्या लूकवरनं वाद पेटला आहे. पण सगळ्यात जास्त वाद हा रावण आणि हनुमानाच्या लूकवरनं उठला आहे. लोकांनी सैफ अली खानच्या लूकची तुलना अल्लाद्दीन खिलजीसोबत केली आहे. तर हनुमानाला चामड्याचा बेल्ट अंगावर परिधान केलेला पाहून लोक भलतेच भडकलेयत. दीपिका चिखलिया देखील यामुळे थोड्याशा नाराज झाल्यात. दीपिका म्हणाल्या,''ज्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका केलेली त्या अरविंद त्रिवेदी यांच्या पात्राशी आदिपुरुषच्या रावणाला म्हणजे सैफला कनेक्ट करायला जाते तेव्हा चांगलं वाटत नाही. हे आहेच की अभिनेता म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य नक्कीच असतं की तुम्ही ती व्यक्तिरेखा तुमच्या माध्यमातून कशी वेगळी साकारता''.

दीपिका पुढे म्हणाल्या,''आता टीझर रिलीज झाला आहे,तो पाहून आपण कोणत्या निर्णयावर पोहोचणं चुकीचं ठरेल. कोणत्याही सिनेमाचा कंटेट पाहणं गरजेचं असेल. पण जेव्हा रामायणाची गोष्ट येते तेव्हा लोकांच्या श्रद्धेचा देखील विचार होणं गरजेचं आहे. आपण जे करतोय त्यात किती साधेपणा,खरेपणा आणि भावना आहेत याचा विचार व्हायलाच हवा. कितीतरी वेळा जेव्हा लोक मला जीन्स घातलेलं पाहतात,तेव्हा ते ओळखत नाहीत मला त्या पेहरावात. कारण आजही लोक त्या रामायणातील सीतेला पूजतात. मी जवळपास जीन्स घालणं त्यामुळे सोडून दिलं आहे. अनेकदा पंजाबी ड्रेसमध्येच मी बाहेर जाते म्हणजे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत''.

आदिपुरुषमध्ये सैफ अली खानच्या रावण या व्यक्तिरेखेची तुलना खिलजीसोबत केली जात आहे. यावर दीपिका म्हणाल्या,''मला वाटतं सिनेमातील व्यक्तीरेखा लोकांना किती कनेक्ट करते हे पाहणं महत्त्वाचं राहील. श्रीलंकेची ती व्यक्तिरेखा वाटायला हवी जर ती तिथली आहे, मुघल नाही दिसला पाहिजे. टीझरमध्ये केवळ ३० सेकंदापुरती रावणाची व्यक्तीरेखा दिसली,त्यातनं मला फार काही कळालं नाही. हो पण पूर्ण वेगळा दिसला रावण आदिपुरुषमधला. मला माहीत आहे की वेळेसोबत बदल हा घडला पाहिजे. व्हीएफक्सचं युग आहे,त्याचा वापर झाला पाहिजे. पण हो,त्यासोबत लोकांच्या श्रद्धेशी खेळू नका. आता केवळ टीझर दिसला आहे,आशा आहे या लोकांनी सिनेमातील कथेसोबत न्याय केला असावा''.

सीता ही व्यक्तिरेखा साकारण्याविषयी दीपिका म्हणाल्या,''अशा पद्धतीची भूमिका साकारणं ज्याच्याशी लोकांची भावना जोडलेली आहे ते खरंतर खूप कठीण असतं. रामानंद सागर यांची रामायण मालिका लोकांसाठी बेंचमार्क आहे. त्यामुळे त्याच्याशी आताच्या आदिपुरुषची तुलना होऊच शकत नाही. लोकांना वाटतं की राम,सीता,रावण जसे रामानंद सागर यांच्या मालिकेत दिसले होते तसेच दिसायला हवेत. आदिपुरुषमध्ये सगळेच आजचे आघाडीचे कलाकार आहेत, ज्यांना आपण खूप वेगळ्या भूमिकांमध्ये आधी पाहिलं आहे त्यामुळे पटकन त्यांना राम,सीता,रावण म्हणून स्विकारणं लोकांना कठीण जाईल. ते आज या सिनेमासाठी असे दिसत आहेत,उद्या कुठल्या दुसऱ्या सिनेमासाठी वेगळ्या लूकमध्ये दिसतील. त्यावेळेला आम्ही रामायण नंतर दुसरं काही केलंच नाही म्हणून आम्हाला आजही लोक त्याच रुपात पाहतात. आणि आमची पूजा करतात''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT