Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir: Esakal
मनोरंजन

Adipurush Row: 'हनुमान देव नव्हतेच ते तर..,' आदिपुरुषच्या वादात लेखक मनोज मुंतशिरच्या विधानानं पुन्हा राडा..

चित्रपटातील संवादावर बराच वादही होत आहे. त्यानंतर आदिपुरुष केवळ रामायणातून प्रेरित असल्याचा दावा केल्यानंतर आता चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आणखी एक खळबळजनक दावा करून वाद निर्माण केला आहे.

Vaishali Patil

Adipurush Dialogue Writer Manoj Muntashir: प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट 'आदिपुरुष 16 जून 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतिक्षा लागून होती. त्यात चित्रपट रिलिज झाल्यानंतर मात्र सर्व चाहत्यांची निराशा झाली.

सुरुवातीला निर्मात्यांनी सांगतिलं की चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. मात्र प्रेक्षकांना त्यात रामायणाचा अंशच दिसला नाही.

रामाणाच्या कथेशी आणि चाहत्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप प्रेक्षक निर्मात्यांवर करत आहे.

सोशल मीडियावरीलही नेटकरी चांगलेच भडकले असून आदिपुरुषच्या निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त करत आहे.

या चित्रपटात बालिश संवाद आणि अॅक्शन सीन आणि VFX वापरले आहेत. त्याचबरोबर रामायणाच्या कथेसोबत काहीतरी मॉडर्न करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.

त्यातच कलाकारांचे लुक विशेषत: रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आणि हनुमानाच्या भूमिकेतील देवदत्त नागे यांच्याबाबतही बराच वाद सुरू आहे.

चित्रपटातील संवादावर बराच वादही होत आहे. त्यानंतर आदिपुरुष केवळ रामायणातून प्रेरित असल्याचा दावा केल्यानंतर आता चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आणखी एक खळबळजनक दावा करून वाद निर्माण केला आहे.

मनोज मुंतशीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते 'हनुमान देव नसून भक्त होते' असं म्हणताना दिसत आहे. यावक्तव्यामुळे मनोज पुन्हा एकदा चाहत्यांच्या निशाण्यावर आहे.

मनोज मुंतशीर यांनी नुकतीच एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. यात हनुमान देव नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मनोज मुंतशीर म्हणतात की, 'बजरंगबली हे देव नव्हतेच, ते भक्त होते. आपण त्यांना देव बनवलं आहे.

चित्रपटातील आपल्या संवादांवर स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले की, हनुमानाने श्री रामसारखे तात्विक बोलत नव्हते. त्याच्या या बोलण्याने पुन्हा एकदा गदारोळ झाला आहे.

आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून नेटकरींनी त्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. त्यांच्या मुलाखतीवर बंदी घालण्याची मागणी ते करत आहेत.

तर काहींना त्यांना ज्ञानाची गरज असल्याच सांगत हनुमान हे भगवान शिव यांचे अवतार असल्याचदेखील त्यांना सांगितलं आहे.

आदिपुरुषवरील संवादावरुन वाढता वाद आणि ट्रोलिंग होत आहे. त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. इतकच नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत.

यामुळे मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती, आता पोलिसांनीही मनोजला पूर्ण सुरक्षा दिली आहे.

त्यातच आता त्याच्या या विधानाने पुन्हा नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT