Mumbai Police provides security to dialogue writer of Adipurush, Manoj Muntashir  Esakal
मनोरंजन

Adipurush dialogue: 'मला सुरक्षा हवी', आदिपुरुषच्या डायलॉग वादाने लेखक घाबरला! पोलिसांनी दिल संरक्षण

Vaishali Patil

Adipurush Diaolgue Controversy: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाबद्दल बरेच वाद विवाद सुरु आहे. आदिपुरुषमधील चित्रपट संवाद आणि दृश्यांवर प्रेक्षक अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यातच चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर याच्यावर प्रेक्षकांचा जरा जास्तच राग आला आहे. सोशल मिडियावर त्यांचीच चर्चा जास्त आहे. नेटकरी मनोज मुंतशीर यांना सोशल मिडियावर वाईटरित्या ट्रोलही करत आहेत.

दरम्यान, आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. या वादानंतर आपल्याला धोका असल्याचे मनोज मुंतशीर यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसाकडे ही मागणी करण्यात आली आहे. पोलिस लेखकाच्या अर्जावर विचार करत होते. दरम्यान आता पोलिसांनी लेखक मनोज मुंतशीर यांना पोलिस संरक्षण दिलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


चित्रपट रिलिज झाल्यापासून सोशल मीडियाद्वारे संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे. 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..'' असा संवाद ऐकल्यानंतर तर प्रेक्षक भडकलेच. यासारखे आणखी काही डायलॉग आहेत ज्यावर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहेत.

अनेक संवादांवर आक्षेप घेण्यात आले आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली. असे छपरी संवाद चित्रपटातुन काढून टाकण्यात यावेत अशी मागणीही चाहत्यांनी केली होती. त्यानंतर मनोज मुंतशीर यांनी देखील याची दखल घेतली होती.

त्यानंतर हे डायलॉग आम्ही चित्रपटातुन काढून टाकू असे सांगितले. एक पोस्ट शेयर करत त्यांनी ही माहिती दिली होती. या शेयर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मनोज मुंतशीर यांनी सांगितले की, त्यांनी या चित्रपटात 4000 हून अधिक संवाद लिहिले आहेत. मात्र त्यांनी लिहिलेल्या 5 डायलॉग्सवर लोकांचा आक्षेप आहे. अशा स्थितीत आठवडाभरात हे संवाद बदलले जातील.


'आदिपुरुष' 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास भगवान श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेनन माता जानकीच्या भूमिकेत तर सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेत आहे. रिलिजच्या तीन दिवसातच या चित्रपटाने तुफान कमाई करत 300 कोटींचा आकडा पार केला आहे.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT