adipurush director om raut death threat mumbai police give him protection  SAKAL
मनोरंजन

Om Raut Death Threat: आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून संरक्षण

दिग्दर्शक ओम राऊत यांनाही पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Devendra Jadhav

Adipurush Director Om Raut Death Threat News: काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांनी डायलॉग आणि सिनेमातील व्यक्तिरेखांच्या चुकीच्या वर्णनावरून प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

त्यामुळे आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांना पोलीस संरक्षण देण्याची विनंती केली होती. मात्र आता दिग्दर्शक ओम राऊत यांनाही पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे समोर आले आहे.

(adipurush director om raut death threat mumbai police give him protection)

एका अहवालानुसार, ओम राऊतच्या कार्यालयात एका सशस्त्र पोलिसासह चार हवालदार अलीकडेच दिसले. देशभरात सुरू असलेल्या वादामुळे आदिपुरुषचा दिग्दर्शक ओमने सुरक्षेची मागणी केली होती.

ओमला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी सावधगिरीची पावले उचलल्याचं स्पष्ट झालंय.

आदिपुरुष चित्रपट त्याच्या संवादांमुळे, कथेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विशेषत: लंका दहन दृश्यादरम्यान हनुमानाच्या तोंडी असलेल्या टपोरी संवादांमुळे प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या.

या प्रतिक्रिया पाहता निर्मात्यांनी काही संवादांवर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते 72 तासांच्या आत बदलण्यात आले. आता ओम राऊतला जीवे मारण्याची धमकी आल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT