Adipurush film in trouble,pleas filed in delhi court,seeking stay on release Google
मनोरंजन

Adipurush: 'आदिपुरुष'च्या प्रदर्शनावर बंदीची मागणी, दिल्ली कोर्टात याचिका दाखल...

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'च्या अडचणी काही थांबायचं नाव घेईनात. टीझर रिलीज झाल्यानंतर मेकर्सना लोकांच्या रागाचाच सामना करावा लागत आहे.

प्रणाली मोरे

Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषच्या अडचणी काही थांबायचं नाव घेईनात. आता दिल्लीतील एका कोर्टात या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून त्यात सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी केली जातेय. हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. सिनेमात राम,सीता,लक्ष्मण,रावण,हनुमान यांच्याभोवती कथा गुंफली गेलीय.पण प्रेक्षकांना त्याचं चित्रिकरण खटकलं आहे. याचिकेत आरोप केला गेला आहे की भगवान राम आणि हनुमान यांच्या अंगावर चामड्याचे बेल्ट दिसत आहेत हे खूप चुकीचं आहे. आणि त्याचं चित्रणही खूप चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलं आहे. तसंच सिनेमातील रावणाला देखील चुकीच्या पद्धतीनं दाखवलं आहे.(Adipurush film in trouble,pleas filed in delhi court,seeking stay on release)

दिग्दर्शक ओम राऊत याच्या 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर आठवड्याभरापूर्वीच रिलीज झाला आणि सगळा वाद सुरु झाला. कितीतरी हिंदू संघटनांनी सिनेमावर हिंदू धर्माचा अवमान केल्याचे आरोप लावले आहेत आणि सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

सिनेमात १० तोंडांच्या रावणाची भूमिका करणाऱ्या सैफ अली खानला तर खूपच हेटाळणी सहन करावी लागत आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांना सुनावताना अनेकांनी म्हटलं की रामायणाचं इस्लामीकरण केल्याची झलक सिनेमात पहायला मिळतेय.

सिनेमातील मिश्या नसलेल्या दाढीवाल्या हनुमानाला सुद्धा लोक नाव ठेवताना दिसत आहेत. त्याच्या अंगावरही चामड्याचा बेल्ट दिसल्यानं लोकांनी नको-नको ते सुनावलं आहे. हिंदू देवांना चुकीच्या पद्धतीनं दाखवत सिनेमातील प्रभु रामचंद्रांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रभासला मिश्या दाखवल्यात ते देखील लोकांना खटकलं आहे.

आता एवढं सगळं सिनेमाप्रती नकारात्मक सुरु असताना सिनेमा प्रदर्शित होताना काय होईल असा सूरही निघतोय. सिनेमाच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आणि दांभिक मतांच्या संघटनांनी सिनेमाच्या टीझरवर ताशेरे ओढलेले दिसून आले. त्यांच्याकडून सिनेमाच्या मेकर्सना धमकी देखील दिली गेली आहे की, सिनेमात धार्मिक पात्रांचं जे चुकीचं चित्रण केलं गेलं आहे ते जर काढून नाही टाकलं तर कायदेशीर कारवाई निर्मात्यांवर केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT