Adipurush VFX eSakal
मनोरंजन

Adipurush VFX : रिलीज झाला आदिपुरूष, मात्र चर्चा राजमौली अन् शाहरूखची! काय आहे कारण?

रामायणावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

Sudesh

प्रभास, सैफ अली खान, क्रिती सॅनोन अशी तगडी स्टारकास्ट असणारा आदिपुरूष आज रिलीज झाला. रामायणावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. प्रभासच्या चाहत्यांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे, तर कित्येक लोकांनी मात्र याच्या व्हीएफएक्समुळे नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विटरवर कित्येक नेटीझन्सनी या चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. मात्र यासोबतच नेटकरी राजमौली आणि शाहरूख खानवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

राजमौलींचं कौतुक

एका ट्विटर यूजरने म्हटलं आहे, की आदिपुरूष पाहिल्यानंतर माझा राजमौलींप्रती असणारा आदर कित्येक पटींनी वाढला आहे. दिग्दर्शकांनी मोठ्या बजेट आणि व्हीएफएक्सच्या बाबतीत राजमौलींची कॉपी करणं सोडायला हवं. राजमौलींचा जन्म भारतात झाला हे आपलं नशीब आहे, मात्र दुर्दैवाने आपल्याकडे एकच राजमौली आहेत.

ब्रह्मास्त्र उत्तम होता

दुसऱ्या एका ट्विटर यूजरने ब्रह्मास्त्र चित्रपटातील व्हीएफएक्सचे फोटो पोस्ट केले आहेत. ब्रह्मास्त्रची स्टोरी तेवढी खास नव्हती, मात्र व्हीएफएक्सच्या बाबतीत या चित्रपटाने आदिपुरूष प्रमाणे निराश नव्हतं केलं. आदिपुरूषच्या सेकंड हाफमधील VFX हे खरंच विनोदी आहेत. असं या यूजरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रा-वनची चर्चा

आणखी एका यूजरने २०११ मध्ये आलेल्या शाहरुखच्या रा-वन (Ra.One) चित्रपटाची आठवण यानिमित्ताने शेअर केली आहे. तेव्हा आपण रा-वनचं हवं तेवढं कौतुक केलं नाही, त्यामुळे आपल्याला आदिपुरूष सारखे चित्रपट पहावे लागत आहेत, अशा आशयाचं ट्विट त्याने केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT