Adipurush makers apologized to the Kathmandu government, requested to remove the banned  SAKAL
मनोरंजन

Adipurush Nepal Controversy: आदिपुरुषच्या मेकर्सने काठमांडू सरकारची मागितली माफी, बंदी हटवण्याची विनंती

आदिपुरुषच्या मेकर्सने काठमांडू सरकारची माफी मागितली. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागलंय.

Devendra Jadhav

Adipurush Nepal Controversy: आदिपुरुष सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमाबद्दल अनेक वाद सुरु आहेत. आदिपुरुष सिनेमावर अनेक जण सडकून टीका करत आहेत.

अशातच नेपाळ काठमांडूच्या महापौरांनी सिनेमावर बंदी घालण्याचं पत्रक जारी केलं. आता आदिपुरुषच्या मेकर्सने काठमांडू सरकारची माफी मागितली. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागलंय.

(Adipurush makers apologized to the Kathmandu government, requested to remove the banned)

खरे तर काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी दावा केला होता की, चित्रपटात सीतेच्या जन्माचे चुकीचे ठिकाण सांगण्यात आले आहे. या आधारे त्यांनी चित्रपटावर बंदी घालण्याचा इशारा दिला होता. त्याच्या धमकीनंतरही निर्मात्यांनी चित्रपटात कोणताही बदल केलेला नाही.

यानंतर बलेन शहा यांनी रविवारी भारतीय चित्रपट शहरात प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर रविवारीच निर्मात्यांनी या प्रकरणी माफी मागणारे पत्र पाठवून बंदी उठवण्याचे आवाहन केले होते.

माफीचं पात्र

आदिपुरुषच्या मेकर्सनी पत्र लिहिलंय की.. जनतेच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रभासच्या डायलॉगवर स्पष्टीकरण देताना निर्मात्यांनी म्हटले आहे की,

भारतीय असल्याने जगभरातील महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वात वरचा आहे. हा चित्रपट कलात्मक पद्धतीनेच पाहावा, असे आवाहन निर्मात्यांनी केले आहे.

या पत्रात पुढे लिहिले आहे की, 'राघवची भूमिका साकारणाऱ्या प्रभासने हे डायलॉग्स बोलले आहेत, 'आज माझ्यासाठी लढू नकोस, त्या दिवसासाठी लढा जेव्हा बदमाश आपल्या मुलीवर हात घालण्याआधी तुमचे पुरुषत्व लक्षात ठेवेल.

सीता मातेच्या जन्मस्थानाशी काहीही संबंध नाही, तो सामान्यतः सर्व स्त्रियांच्या विशेषत: भारतातील स्त्रियांच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. भारतीय असल्याने जगभरातील महिलांचा सन्मान आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. असं या पत्रात लिहिलंय.

आता मेकर्सने माफी मागितल्यावर आदिपुरुष वर काठमांडू, नेपाळमध्ये बंदी उठवली जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT