Adipurush makers left the silence More money for a seat next to Hanuman? SAKAL
मनोरंजन

Adipurush: हनुमानाच्या शेजारच्या सिटसाठी अधिक पैसे? आदिपुरुषच्या निर्मात्यांनी सोडलं मौन

आदिपुरुष सिनेमाबद्दल एक मोठी अफवा समोर आलीय. त्या अफवेला निर्मात्यांनी उत्तर दिलंय.

Devendra Jadhav

Adipurush Movie News: आदिपुरुष सिनेमा अवघ्या काहीच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आदिपुरुष सिनेमाची चर्चा गेली अनेक वर्ष सुरु आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची उत्सुकता देशभरात नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणावर आहे. आदिपुरुषचे निर्माते सिनेमा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध शक्कल लढवत आहेत. अशातच आदिपुरुष सिनेमाबद्दल एक मोठी अफवा समोर आलीय. त्या अफवेला निर्मात्यांनी उत्तर दिलंय.

काय आहे ही अफवा:

आदिपुरुष संदर्भात नुकतीच अशी बातमी आली होती की, निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानजींसाठी एक जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. यानंतर सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की, ज्याला या राखीव सीटच्या शेजारी बसायचे असेल त्याला जास्त रक्कम मोजावी लागेल. यावर टी-सीरीजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे उघड केले आहे.

निर्मात्यांचा खुलासा:

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना निरामटे T-Series ने लिहिले की, फसवणुकीचा इशारा... आदिपुरुषच्या तिकिटाच्या किमतीबाबत मीडियामध्ये काही दिशाभूल करणारी वृत्त फिरत आहेत. आम्‍हाला हे स्‍पष्‍ट करायचे आहे की, हनुमानजींच्‍या राखीव आसनाच्या शेजारच्‍या सीट दरात कोणताही फरक पडणार नाही. T-Series ने पुढे लिहिले, "चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका... जय श्री राम." अशाप्रकारे आदिपुरुषच्या निर्मात्यांनी हनुमानासाठी जी सीट राखीव ठेवली आहे, त्याच्या बाजूच्या सीटची रक्कम सामान्यच असणार आहे..

एक सीट हनुमानसाठी:

आदिपुरुष प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी एक मोठी घोषणा करण्यात आलीय. आदिपुरुष चित्रपटगृहात जिथे चित्रपट प्रदर्शित होत आहे तिथे एक सीट राखीव ठेवण्यात येईल असे ठरवण्यात आले आहे. म्हणजे संपूर्ण शो दरम्यान एक जागा रिकामी असेल.

अशी श्रद्धा आहे की, जिथे रामायणाचा उल्लेख आहे तिथे हनुमानाचा वास असतो. या विश्वासाला पाठिंबा देत निर्मात्यांनी प्रत्येक चित्रपटगृहात बजरंगबलीच्या नावाने एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांना त्यांचा चित्रपट भगवान हनुमानांसमोर प्रदर्शित करायचा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT