Adipurush Movie Mukesh Khanna  esakal
मनोरंजन

Adipurush Controversy : आदिपुरुषच्या टीमला जिवंत जाळा! शक्तिमानचा संताप

मुकेश यांनी रामायणावर आधारित ओम राऊत यांनी जी कलाकृती तयार केली आहे त्यावर सडकून टीका केली आहे.

युगंधर ताजणे

Mukesh Khanna On Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटानं वेगवेगळे वाद ओढावून घेतले आहे. भलेही या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात तीनशे कोटींहून अधिक कमाई केली असेल मात्र त्यावरुन झालेले वादानं अनेकांचा संताप झाला आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेते शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

मुकेश यांनी रामायणावर आधारित ओम राऊत यांनी जी कलाकृती तयार केली आहे त्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी यापूर्वी देखील आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आदिपुरुषच्या मेकर्सवर निशाणा साधला होता. मात्र आता त्यांचा प्रचंड संताप झाला असून त्यांनी आदिपुरुषच्या टीमवर सडकून राग व्यक्त केला आहे. त्यांनी यापूर्वी हनुमान यांच्या तोंडी जे संवाद होते त्यावरुनही आगपाखड केली होती.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

रामायणाची टिंगल टवाळी करण्यात आली...

मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे की, आदिपुरुषच्या निर्मात्यांनी जे काही तयार केले त्याचा दर्जा अतिशय सुमार होता. त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. त्यांनी या चित्रपटातील पात्रांच्या तोंडी जे संवाद टाकले आहेत त्यामुळे त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. ओम राऊत हे हॉलीवूडच्या दिग्दर्शकांच्या कलाकृतींनी फारच प्रभावित झाल्याचे दिसून येतात. ते या चित्रपटाच्या निमित्तानं दिसून येते.

मुकेश खन्ना हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत. सोशल मीडियावर ते सतत सक्रिय असतात. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील बदलांवर थेटपणे भाष्य करणारे सेलिब्रेटी म्हणून ते ओळखले जातात. आता त्यांनी आदिपुरुषला एक शापच देऊन टाकला आहे. त्यात ते म्हणतात, त्या चित्रपटांच्या निर्मात्यांना माफी नाही. त्यांना ५० डिग्री तापमानात जिवंत जाळलं पाहिते. अशा शब्दांत त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली पाहिजे.

हॉलीवूडसारखं काही तयार करावे अशी त्यांची योजना होती मात्र त्यात त्यांनी रामायणाची विटंबना केली आहे. तुम्हाला तर सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची आहे तर तुम्ही एखादी काल्पनिक चित्रपट तयार करायचा होता. मात्र तुम्ही तसे केले नाही. तुम्ही देवाच्या प्रतिमेचा अपमान का केला असा प्रश्न त्यांनी ओम राऊत यांना केला आहे. आदिपुरुषची खूप टिंगल टवाळी करण्यात आली आहे. असेही खन्ना यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT