adipurush, adipurush motion poster, kriti sanon, prabhas, om raut SAKAL
मनोरंजन

Adipurush: आदिपुरुष चा नवीन मोशन पोस्टर.. वाद झाल्यानंतर सीतेच्या भांगेत आली कुंकू - टिकली

यात सीतेच्या कपाळी कुंकू नसल्याने वाद झाला होता

Devendra Jadhav

Adipurush New Motion Poster Out Now: गेल्या अनेक दिवसांपासून आदिपुरुष सिनेमाची चर्चा आहे. आदिपुरुष सिनेमात असलेल्या प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची झलक दाखवणारे मोशन पोस्टर रिलीज झाले. या मोशन पोस्टर मध्ये क्रिती सेनन सीतामाईंच्या भूमिकेत दिसतेय. काहीच दिवसांपूर्वी आदिपुरुषचा नवीन पोस्टर आऊट झाला होता. यात सीतेच्या कपाळी कुंकू नसल्याने वाद झाला होता. पण आदिपुरुषच्या नवीन मोशन पोस्टरमध्ये सीताच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सेननच्या कपाळी कुंकू आणि टिकली आली आहे.

काहीच दिवसांपूर्वी आलेल्या पोस्टरमुळे नवीन वाद झालेला. सीतेच्या भूमिकेत असलेल्या क्रिती सेननला अविवाहीत महिला म्हणून सादर करत तिला विनाकुंकू म्हणून दाखवण्यात आले आहे. चित्रपट निर्मात्यांनी हे जाणीवपूर्वक केले आहे. अशाप्रकारे त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. आदिपुरुषच्या त्या पोस्टरवरुन मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी देखील तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीमध्ये म्हटले गेले आहे की, चित्रपट निर्मात्यांनी रामचरितमानस मधील ज्या व्यक्तिरेखा चित्रपटामध्ये घेतल्या आहेत त्यांचे चुकीचे चित्रण केले आहे. हिंदू धर्मियाच्या भावना दुखावल्याप्रकरणी कलम २९५ अन्वये २९८, ५००, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये सुगंधित तंबाखूचा अवैध कारखाना उद्ध्वस्त; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला ताब्यात घेतले

Marathi News Live Updates : टोरेंट, पोशीर, शिलार, टाटा प्रकल्पांमुळे उध्वस्त होणारे पर्यावरण वाचवण्यासाठी कर्जतमध्ये ' 'कॅंडल मार्च'

१३ दिवसांनी राहू बदलणार रास; ३ राशींना नोकरी, व्यवसायात मिळणार मोठं यश!

Pune Traffic News : सूस-लवळे रस्त्यावरील वाहतूक उद्या सुरळीत सुरू राहणार; रस्ता बंद असल्याचा व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा

PMC Bulldozer Action : पुणे महापालिकेची रविवारीही अतिक्रमणविरोधी धडक मोहीम; वाघोली, बाणेर, बालेवाडी, औंध आणि धनकवडी-कात्रज परिसरात बांधकाम जमीनदोस्त

SCROLL FOR NEXT