Adipurush OTT Release:  Esakal
मनोरंजन

Adipurush OTT Release: गदर 2 अन् OMG2 च्या राड्यात प्रभासचा 'आदिपुरुष' गुपचूप ओटीटीवर रिलिज!

Vaishali Patil

Adipurush OTT Release: आदिपुरुष हा सिनेमा यावर्षातील सर्वात वादग्रस्त चित्रपट ठरला. सिनेमाचे VFX, डायलॉग, पवित्र रामायणाचं केलेलं विडंबन अशा अनेक गोष्टींमुळे या चित्रपटावर कडाडून टिका करण्यात आली. या चित्रपटाच्या संपुर्ण टिमला प्रेक्षकांनी ट्रोल केलं.

या चित्रपटातील बऱ्याच गोष्टींवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यातील टपोरी संवादमुळे तर नेटकऱ्यांनी आदिपुरुष सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर यांना ट्रोल केलं त्यानंतर माफी मागत त्यांनी चित्रपटातील संवाद बदलले. चित्रपटाचं बजेट जवळपास 600 कोटींच्या आसपास होते मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.

आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर जवळपास 2 महिन्यांनंतर आदिपुरुषने OTT वर एंट्री मारली. आता सिनेमा कुठे स्ट्रीम झाला आहे. चित्रपट कधी आणि कुठे पाहू शकता हे जाणुन घ्या.

प्रभास आणि क्रिती सेनॉनची मुख्य भुमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यावेळी निर्मात्यांनी कोणतीही घोषणा किंवा प्रमोशन न करता गुपचूप ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित केला. आदिपुरुष शुक्रवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी OTT वर 5 भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

मात्र हा सिनेमा दोन वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आला आहे. आदिपुरुष हा मूळ हिंदी आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट शुट करण्यात आला होता.

त्यानंतर इतर भाषेत हा सिनेमा डब करण्यात आला होता. त्यातच आता हिंदीत आदिपुरुष Netflix वर प्रदर्शित झाला तर Amazon Prime Video वर मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि कन्नड भाषेत हा सिनेमा स्ट्रीम केला गेला आहे.

राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लंकेशच्या भूमिकेत सैफ अली खान यांनी स्टारर 'आदिपुरुष 'ने ओपनिंग तर चांगली दिली मात्र नंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला.

आदिपुरुष हा धार्मिक ग्रंथ रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. टी-सीरीजच्या बॅनरखाली याची निर्मिती झाली.

प्रभास आणि क्रितीशिवाय सनी सिंग, देवदत्त नाग, वत्सल शेठ, सोनल चौहान, सिद्धांत कर्णिक, कृष्णा कोटियन आणि तृप्ती तोडरमल यांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.

आता हा सिनेमा ओटीटीवर रिलिज झाला असून त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सूकतेचे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT