Adipurush: Prabhas And Saif Ali Khan Fees Google
मनोरंजन

Adipurush: प्रभास-सैफच्या मानधनात मोठी तफावत,एकाला दिले १०० करोड,तर दुसऱ्याला फक्त...

'आदिपुरुष' विषयी लोकांमध्ये उत्सुकता होती आणि लोकांना सिनेमा पहायचाही होता पण आता टीझर रिलीज झाल्यानंतर याविषयी प्रत्येकाचं वेगळं मत समोर येत आहे.

प्रणाली मोरे

Adipurush: प्रभास आणि सैफ अली खान अभिनित आदिपुरुषच्या टीझरने लोकांमध्ये जबरदस्त बोलबाला सुरु केला आहे. सिनेमाविषयी लोकांमध्ये उत्सुकता होती आणि लोकांना सिनेमा पहायचाही होता पण आता टीझर रिलीज झाल्यानंतर याविषयी प्रत्येकाचं वेगळं मत समोर येत आहे. बरं यावरनं सुरु असलेले वाद बाजूला ठेवूया दोन मिनिटं आणि जाणून घेऊया सिनेमातील भूमिकांसाठी म्हणजे राम-रावण साकारण्यासाठी प्रभास आणि सैफनं किती मानधन घेतलं होतं?(Adipurush: Prabhas And Saif Ali Khan Fees)

समोर आलेल्या रीपोर्टनुसार प्रभासला आदिपुरुषमध्ये रामाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी १०० करोड मानधन मिळालंय. त्यानंतर त्याच्या काही फॅन पेजवर समोर आलंय की प्रभासने सिनेमासाठी १५० करोडचं मानधन मागितलं होतं. तसं पाहिलं तर आकडा योग्यच आहे त्याच्या दृष्टीने कारण तो इंडस्ट्रीतला सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. हे झालं प्रभासचं म्हणजे रामाचं, पण याच सिनेमात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफला किती पैसे मिळाले बरं?

ओम राऊतच्या आदिपुरुषमध्ये रावणाची भूमिका साकारण्यासाठी म्हणे सैफने १२ करोड रुपये चार्ज केले होते. तसं मग पाहिलं तर सैफ अली खान आणि प्रभासच्या मानधनात मोठी तफावत आहे.पण रिपोर्ट्सनुसार समोर येतंय की रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या तुलनेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफची भूमिका फार मोठी नाहीय.

सिनेमात सीतेची भूमिका साकारणारी कृती सनन देखील सुरुवात आणि शेवट अशीच दिसणार आहे. रावणानं हरण केल्यानंतर सिनेमात सीतेची भूमिका फारच छोटी दिसेल. बातमी आहे की, कृती सनननं ३ करोड रुपये सीतेच्या भूमिकेसाठी घेतले आहेत. तर लक्ष्मणची भूमिका साकरणाऱ्या सनी सिंगने १.५ करोड चार्ज केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT