adipurush Prabhas fan Vein cut by beer glass, tikka on poster with blood  SAKAL
मनोरंजन

Adipurush Prabhas Fan: बिअरच्या ग्लासने नस कापली, रक्ताने पोस्टरवर लावला टिक्का, प्रभासचा फॅन असाही

बाहुबली स्टार प्रभासचा आदिपुरुष रिलीज झालाय. यावेळी मात्र प्रभासच्या फॅनने हद्दच केली. काय घडलंय नेमकं जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Prabhas Fan Video News: साऊथ अभिनेत्यांची त्यांच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ असते हे आपल्याला माहीतच आहे. साऊथ स्टार्ससाठी त्यांचे फॅन्स वेडे असतात.

रजनीकांतचे सिनेमे जेव्हा रिलीज होतात तेव्हा त्याचे फॅन्स दुधाने त्यांच्या पोस्टरवर अभिषेक करतात.

बाहुबली स्टार प्रभासचा आदिपुरुष रिलीज झालाय. यावेळी मात्र प्रभासच्या फॅनने हद्दच केली. काय घडलंय नेमकं जाणून घ्या.

(adipurush Prabhas fan Vein cut by beer glass, tikka on poster with blood)

प्रभासचे चाहते बेभान झाले आहेत. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रभासचा एक चाहता बिअरच्या बाटलीने त्याचा हात कापताना दिसत आहे.

त्याच रक्ताने हा माणूस 'आदिपुरुष'च्या पोस्टरवर प्रभासच्या कपाळावर टिळक लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ आंध्र प्रदेश किंवा तेलंगणातील असल्याचं समजतंय.

काय आहे या व्हिडिओत?

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात बिअरची तुटलेली बाटली घेऊन जल्लोष करताना दिसत आहे. तो तुटलेल्या बाटलीने आपले मनगट कापतो आणि त्याच रक्ताने 'आदिपुरुष'च्या पोस्टरवर टिळक लावतो.

इतरही अनेक चाहते पोस्टरसमोर नारळ फोडताना आणि प्रभासला पुष्पहार घालताना दिसत आहेत. आदिपुरुष सिनेमा पसंत / नापसंत करणारे दोन गट निर्माण झाले आहेत. जे लोकं सिनेमा पसंत करत आहेत ते सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेत आहेत.

आदिपुरुष विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

आदिपुरुष सिनेमा रिलीज होऊन एक दिवस झाले नाहीच तोच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

आदिपुरुष’ चित्रपटातील राम, सीता, रावण आणि हनुमान या पात्रांचा समावेश असलेली कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची किंवा दुरुस्त करण्याचे निर्देश मागणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. जनहित याचिका (PIL) म्हणून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की

चित्रपटातील पात्रे 'रामायण' या महाकाव्यातील या धार्मिक व्यक्तींच्या चित्रणापासून विचलित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुण्यात भाजपचं सहावे पॅनल विजयी

BMC निवडणुकीत विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट ते मनसे; कुणाचे किती उमेदवार जिंकले?

Latur Municipal Corporation Election Result 2026 : लातूरमध्ये विलासरावांच्या पुण्याईचा विजय, भाजपच्या सेल्फ गोलचा काँग्रेसने कसा उठवला फायदा ?

Baramati Municipal: बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड; शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार!

Ichalkaranji Result 2026 Won Candidate List : इचलकरंजीत भाजपचा बोलबाला की धक्का? चुरशीच्या लढतीनंतर महापालिकेत सत्ता कुणाची? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT