Adipurush Prabhas-Kriti Sanon: Esakal
मनोरंजन

Adipurush: 'आदिपुरुष'ने रिलीजपूर्वीच कसे कमावले 420 कोटी रुपये?

सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन यांचा नवीन चित्रपट आदिपुरुष बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे. वाद, ट्रेलर आणि नवीन गाण्यांच्या रिलीजनंतर हा चित्रपट आता कमाईच्या बाबतीत चर्चेत आला आहे.

Vaishali Patil

Adipurush Prabhas-Kriti Sanon: सुपरस्टार प्रभास आणि क्रिती सेनन यांचा नवीन चित्रपट आदिपुरुष बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खुप आवडला होता. आता या चित्रपटाचे दोन गाणेही रिलिज करण्यात आले. जे काही तासातच सोशल मिडियावर व्हायरल झाले.

नेटकऱ्यांना ही गाणी कमालीची आवडली. या गाण्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहे. आता चित्रपटाचे कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतिच क्रिती ही नाशिकमधील पंचवटीला भेट दिली आणि सिता मातेचे आशिर्वाद घेतले.

हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये हा चित्रपट रिलिज होणार आहे. आदिपुरुष मधील प्रभु रामच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेतील क्रिती अन् लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग तर लंकेशपती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसत आहे.

आता हा चित्रपट रिलिज होण्यासाठी काहीच दिवस उरलेले आहे. त्यापुर्वी पुन्हा हा चित्रपट चर्चेत आला तो या चित्रपटाच्या रिलिजपुर्वीच केलेल कमाईमुळे.

अलीकडेच आदिपुरुषच्या कमाईशी संबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 420 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

hindi.asianetnews या न्यूज पोर्टलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे चित्रपटाचे थिएटर हक्क 2 राज्यांमध्ये 170 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. इतकच नाही तर याशिवाय या चित्रपटाची ओटीटी डीलही पूर्ण झाली असून सर्व भाषांचे हक्क नेटफ्लिक्सने 250 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

अशा परिस्थितीत या चित्रपटाने जवळपास 420 कोटींची कमाई केली आहे. असे वृत्त व्हायरल होत असले तरी आदिपुरुषच्या कमाईबाबत अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खानसह अनेक कलाकार दिसणार आहेत. आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे, परंतु तो रिलीज होण्यापूर्वी अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे.

अनेक वाद आणि ट्रोलिंगनंतर आदिपुरुष आता चित्रपट चाहत्यांमध्ये त्याच्या जागी यशस्वी होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT