Adipurush Saif Ali Khan Look Esakal
मनोरंजन

Adipurush Saif Ali Khan Look: 'आम्हाला रामापेक्षा रावणच आवडला!' सैफच्या लूकची पडली भुरळ

Vaishali Patil

Adipurush Saif Ali Khan Look: 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांना वेड लावले आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. प्रभास आणि क्रिती सेननचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतने वाट पहात होते. त्यातच आज निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज केला. काही तासातच ट्रेलरचे व्ह्यूज हे मिलियनच्या पार गेले आहे.

आदिपुरुष मधील प्रभु रामच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेतील क्रिती अन् लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग चाहत्यांना आवडलेच मात्र सर्वांचे लक्ष वेधुन घेतले ते लंकेशपती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान याच्या दमदार अभिनयाने.

सैफला दोनदा रावणाच्या भूमिकेत दाखवले आणि दोन्ही वेळा तो अल्पावधीसाठीच पडद्यावर दिसतो. सैफ अली खानने यापूर्वी असा कोणताही पौराणिक चित्रपट केला नव्हता किंवा तो राजा महाराजा प्रकारातील भूमिकेत दिसलाही नव्हता. त्यामुळेच देखील तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

विशेषत: सैफ अली खान साकारत असलेले पात्र लंकेश सर्वांनाच खूप आवडले. ट्रेलर पाहतांना एकवेळ मनात विचारही येतो की रावण दाखवलाच नाही तितक्यात शेवटच्या काही सेकंदात सैफचं रावण रुप दिसतं. त्याची व्यक्तिरेखा खूप प्रभाव आहे.

प्रभू रामाचा महिमा आणि सीते मातेची प्रसन्नता पाहून चाहते थक्क झाले आहेत. तर लंकेशच्या निर्भीड भुमिकेनेही अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे.

ज्या क्लोज-अपमध्ये लंकेश आपले निळे डोळे उघडतो आणि पाठीमागून ऐकू येत असलेला व्हॉइसओव्हर त्यात त्याचा रागीट अवतार त्यानंतर साधूच्या वेशात सैफ अली खानची झलकही अनेकांना भुरळ पाडते.

आतापर्यंत, चित्रपटाचे बरेच पोस्टर रिलिज करण्यात आलेले आहेत. मात्र त्यात लंकेशचा लूक अजूनही उघड करण्यात आलेला नाही आणि ट्रेलरमध्येही तो जास्तवेळ दिसत नाही.

त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की लंकेशचा लूक रिव्हिल करण्यासाठी निर्माते काही वेगळं प्लॅनिंग करत आहेत की काय ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

Cheque Clearance Rule: आरबीआयचा मोठा निर्णय; आजपासून चेक लगेच क्लिअर होणार, बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता; हवामानशास्त्र तज्ज्ञ डॉ. डाखोरे यांचा इशारा

AVN Disease: एव्हीएन प्रमुख कारण, अत्याधुनिक उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य; तारुण्यातच ‘हिप जॉइंट रिप्लेसमेंट

Sangli Politics : शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का! आमदार पूत्र करणार भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT