Aditya Narayan 
मनोरंजन

Aditya Narayan: माइकनं मारलं.. फोनही फेकला! कॉन्सर्टमध्ये आदित्यकडून चाहत्यासोबत गैरवर्तन; नेटकऱ्यांनी केली सडकून टीका

Aditya Narayan: सध्या आदित्यच्या भिलाई कॉन्सर्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या कॉन्सर्टमधील आदित्यचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

priyanka kulkarni

Aditya Narayan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) हा अनेक वेळा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. आदित्यच्या कॉन्सर्टचे आयोजन विविध ठिकाणी केलं जातं. सध्या आदित्यच्या भिलाई कॉन्सर्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या कॉन्सर्टमधील आदित्यचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आदित्य हा एका चाहत्याला माइकनं मारतो आणि त्याचा फोन हिसकावून घेऊन फेकून देतो.आदित्यनं चाहत्याला दिलेले ही वागणूक पाहिल्यानंतर त्याच्यावर नेटकरी टीका करत आहेत.

आधी माइकनं मारलं नंतर फोन हिसकावून फेकला

गायक आदित्य नारायणचे छत्तीसगडमधील भिलाई येथील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्ट आयोजित करण्यासाठी गेला होता. या कॉन्सर्टला संगीतप्रेमी आणि आदित्यच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती. कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आदित्य शाहरुख खानच्या 'डॉन' चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे. गाणे गात असताना आदित्य एका चाहत्याला माइकनं मारतो आणि त्याचा फोन हिसकावून घेऊन फेकून देतो, असं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांनी केली टीका

काॉन्सर्टमध्ये आदित्य चाहत्यावर कशामुळे भडकला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण भर कॉन्सर्टमध्ये आदित्यनं चाहत्याला दिलेल्या या वागणूकीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "आदित्य नारायण असं का वागतो? इतका अहंकार कशासाठी? स्वतःच्या चाहत्यांचा अनादर का करतोय?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT