aditya narayan  Team esakal
मनोरंजन

'मला इतर म्युझिक लेबल्सच्या फालतू करारांची गरज नाही'

गायन क्षेत्रातील करिअरविषयी आदित्य नारायणचं वक्तव्य

स्वाती वेमूल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने वयाच्या १८व्या वर्षी सूत्रसंचालक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सा रे ग म प या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन त्याने केलं होतं. त्यावेळी या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी आदित्यला साडेसात हजार रुपये मानधन मिळत होतं. आदित्य सध्या 'इंडियन आयडॉल १२' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहेत. या प्रवासाबद्दल बोलताना आदित्यने गाण्यात करिअर करायला जास्त आवडत असल्याची भावना व्यक्त केली. (Aditya Narayan says he does not need to rely on rubbish contracts of music labels slv92)

'बॉलिवूड लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायण म्हणाला, "सा रे ग म पचं सूत्रसंचालन करण्यासाठी मला प्रत्येक एपिसोडचे साडेसात हजार रुपये मिळायचे. त्यावेळी मला ती रक्कम खूप मोठी वाटायची. त्यामुळे आता जेव्हा ते मला कोट्यवधी रुपयांची ऑफर देतात, तेव्हा त्यांना नकार देण्यासाठी माझं मन दुखावतं. मी इतकी वर्षे टेलिव्हिजनवर काम केलंय आणि त्यातून मिळालेल्या पैशांतून मी स्वत:चं म्युझिक लेबल लाँच करू शकतो, स्वत:चे म्युझिक व्हिडीओ बनवू शकतो. पण मी माझ्या आयुष्याच्या एका अशा ठिकाणी पोहोचलो आहे, जिथे मला लोकांनी यशस्वी टीव्ही स्टारपेक्षा स्ट्रगलिंग म्युझिशिअन म्हणून ओळखलं तर जास्त आवडेल. माझ्या नावापुढे गायक किंवा संगीतकार लावलं तर मला ते फार आवडेल. मग तुम्ही मला अपयशी, शिकणारा किंवा अंडररेटेड म्हटलंत तरी चालेल."

"प्रसिद्धा, पैसा, घर, गाडी हे सर्व मला टेलिव्हिजन इंडस्ट्रीने दिलं. पण माझं पहिलं प्रेम हे संगीतच आहे आणि असेल. मी सूत्रसंचालक झाल्यापासून मी गायकसुद्धा आहे हेच लोक विसरू लागले आहेत. वर्षातून मी फक्त दोन-तीन गाणी गातो आणि उरलेल्या वेळात टीव्ही शोज करतो. गेल्या १८ वर्षांपासून मी इंडस्ट्रीत काम करतोय. मी आता ३३ वर्षांचा आहे आणि देवाच्या कृपेने स्वत:च्या मेहनतीने सर्व कमावलंय. मला इतर म्युझिक लेबल किंवा आठ वर्षे त्यांचा गुलाम म्हणून काम करून घेणाऱ्या त्यांच्या फालतू करारांची गरज नाही", असं तो पुढे म्हणाला.

२०२२ नंतर टेलिव्हिजनवर सूत्रसंचालन करणार नाही, असा निर्णय नुकताच आदित्यने जाहीर केला. आदित्यने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री श्वेता अगरवालशी लग्नगाठ बांधली. गेल्या दहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 'शापित' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT