Aditya Narayan shares news of Shweta Agarwals pregnancy  
मनोरंजन

आदित्य नारायण लवकरच होणार बाबा, पत्नी श्वेताने दिली 'गुड न्यूज'

२०२० मध्ये या दोघांनी केलं लग्न

स्वाती वेमूल

गायक आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन सूत्रसंचालक आदित्य नारायण (Aditya Narayan) लवकरच बाबा होणार आहे. आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) गरोदर असून नुकतंच या दोघांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे चाहत्यांना गोड बातमी दिली. आदित्यने मॅटनिर्टी शूटचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 'लवकरच आमच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. श्वेता आणि मी अत्यंत कृतज्ञ आणि आनंदी आहोत', असं आदित्यने लिहिलं. आदित्यच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Aditya Narayan Shares News of Shweta Agarwal's Pregnancy)

श्वेताने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या एका दिवसानंतरच आदित्यने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. २०२२ मध्ये टेलिव्हिजनमधून ब्रेक घेईन तेव्हा मी बाबा होण्याचा विचार करेन, असं आदित्यने गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आदित्य आणि श्वेता हे एकमेकांना 10 वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर 1 डिसेंबर 2020 रोजी त्यांनी लग्न केलं. त्यात केवळ दोघांच्या परिवारातील आणि जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी झाले होते. आदित्य आणि श्वेताची ओळख ही शापित चित्रपटाच्या सेटवर झाली होती. शापित हा आदित्यचा पहिलाच चित्रपट होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : पिंपळनेरकडे येणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक; ७१.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT