Aditya Roy Kapoor  esakal
मनोरंजन

Aditya Roy Kapoor : आदित्य तरुणींच्या गराड्यात सापडला! तरुणींनी त्याच्या....

आदित्य हा सध्या त्याच्या द नाईट मॅनेजर नावाच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आला आहे. याशिवाय त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच बातमीचा विषय होताना दिसतो आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aditya Roy Kapur Kissing Video Viral : ज्यांनी आशिकी २ पाहिला असेल त्यांना आदित्य रॉय कपूर कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आपल्या वेगळ्या शैलीच्या अभिनयानं त्यानं लाखो चाहत्यांना वेडं केलं आहे. आदित्यची क्रेझ ही मोठी आहे. त्याला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. बॉलीवूडचा हँडसम हंक म्हणून आदित्यचे नाव घेतले जाते.

आदित्यचा फॅन फॉलोइंग किती मोठा हे त्याच्या एका व्हिडिओवरुन दिसून आले आहे. आदित्य रॉयचे कपूरचं नाव गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडेशी जोडले जात आहे. त्या दोघांनाही नुकतचं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीमध्ये स्पॉट केलं गेलं. तो जेव्हा त्या पार्टीला गेला होता तेव्हा त्या दरम्यान तिथं त्याच्या चाहत्यांनी त्याला गराडा घातला. यामध्ये तरुणींची संख्या अधिक होती.

आदित्य हा सध्या त्याच्या द नाईट मॅनेजर नावाच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आला आहे. याशिवाय त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच बातमीचा विषय होताना दिसतो आहे. त्यामध्ये अनेक तरुणींनी त्याला गराडा घातला असून त्या त्याला किस करताना दिसत आहे. तो प्रकार पाहून आदित्यही काही काळ घाबरुन गेला आहे. शेवटी तिथं असलेल्या सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करुन त्याची सुटका करुन घ्यावी लागली.

त्या हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये आल्यानंतर चाहत्यांनी त्याला गराडा घातला. त्यानंतर त्यातून त्याची सुटका होत नव्हती. त्यामुळे तोही वैतागला होता. प्रत्येकाला त्याच्यासोबत फोटो काढायचा होता. यामुळेच की काय तरुणींनी तर आदित्यला फोटोसाठी चांगलाच त्रास दिला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो व्हिडिओ द नाईट मॅनेरजर या वेबसीरिजच्या स्क्रिनिंगच्या वेळचा आहे. ते स्क्रिनिंग पाहिल्यानंतर तो बाहेर पडताच चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छाही भलत्याच भन्नाट आहे.

काहींनी आदित्यला बिचारा असे म्हटले आहे.अरे देवा हा त्या तरुणींच्या घोळक्यात सापडला आता त्याचे कसे होणार! असा प्रश्न नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT