Adnan Sami news  esakal
मनोरंजन

Adnan Sami Maldives Photo: आईशप्पथ! हा अदनान सामी आहे?

बॉलीवूडमध्ये अदनान सामीला कुणी ओळखत नाही असे होणार नाही. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार म्हणून त्याची ओळख आहे.

युगंधर ताजणे

Adnan Sami Transformation: बॉलीवूडमध्ये अदनान सामीला कुणी ओळखत नाही असे होणार नाही. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार म्हणून त्याची ओळख आहे. काही रियॅलिटी शो मध्ये त्यानं परीक्षकाची भूमिका त्यानं निभावली आहे. (Bollwood Celebrity News) अदनान सामी पूर्वी त्याच्या वजनदार शरीरासाठी ओळखला जात होता. काही दिवसांअगोदर त्याचा नव्या रुपातील फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला की अरे कोण आहे, बऱ्याच वेळानंतर त्यांना क्लिक झाले की, तो अदनान सामी आहे. एवढा मोठा फरक त्या फोटोंमध्ये होता. (Adnan Sami Transformation News)

अदनान सामीनं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनंतरचा फोटो व्हायरल केला आहे. त्याच्या त्या (Bollywood Fitness Freak Celebrity) फोटोंना सोशल मीडियावरुन मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी त्या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अदनान सामी हा मालदीवला गेला असताना तेथील काही फोटो त्यानं व्हायरल केले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला की हा कोणता नवा अभिनेता आहे? तो फोटो अदनान सामीचा असून चाहत्यांनी त्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अदनान सामीचं वजन 230 किलो होतं त्यानं अकरा महिन्यांमध्ये 165 किलो वजन कमी केलं आहे. त्याचे ते नवे रुप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

कुणाला सांगून विश्वास बसणार नाही पण सुरुवातीला अदनान सामीचं वजन हे 230 किलोचे होते. त्यानंतर त्यानं मोठ्या मेहनतीनं वजन कमी करण्यास सुरुवात केली होती. अखेर त्याला त्यात यश आले. अदनान सामीनं मालदीव डायरी स्पेशल काही फोटो शेयर केले आहेत. त्या फोटोंमध्ये तो ब्लॅक टी शर्ट आणि गॉगल या वेषात दिसतो आहे. ते फोटो पाहून एका नेटकऱ्यानं त्याला कमेंट केली आहे की, तू आहेस तरी कोण? दुसऱ्यानं लिहिलं आहे की, मोठा बदल....

50 वर्षीय अदनान सामीचा मोठा चाहतावर्ग भारतात आहे. भलेही तो पाकिस्तानचा असला तरी भारतामध्ये त्याला मोठया प्रमाणावर चाहतावर्ग मिळाला आहे. अदनानला देखील काही कारणांमुळे मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं होतं. डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. त्यानंतर त्यानं मोठ्या मेहनतीनं वजन कमी करुन चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP AIMIM Row: ओवैसींसोबत युतीचा फटका! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा महाराष्ट्रात ‘थेट इशारा’, पडद्यामागे काय घडलं?

Gold Price Fall : सोन्या-चांदीचे भाव घसरले, गुंतवणूकदारांना दिलासा; शेअर बाजाराचा आलेखही घसरला

Devendra Fadnavis: गरिबांचे पैसे खाल्‍लेल्‍यांना जेलची हवा खायला लावणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘सिस्पे’ गैरव्यवहाराची ‘सीबीआय’ चौकशी करू!

Accident News: कन्नड घाटातील भीषण अपघातात शेवगावच्या तिघांचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी, देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला!

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

SCROLL FOR NEXT