मनोरंजन

तालिबानी आले, अफगाणिस्तानातील प्रसिद्ध गायिकेनं सोडला देश

अफगाणिस्तानमध्ये सध्या अराजकता आहे. वातावरण दूषित झाले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अफगाणिस्तानमध्ये सध्या अराजकता आहे. वातावरण दूषित झाले आहे. तेथील नागरिकांमध्ये भय आहे. कमालीची असुरक्षितता आहे. अशा परिस्थितीत कसे जगावे असा प्रश्न अफगाण नागरिकांना पडला आहे. तालिबान्यांनी आक्रमण करुन देशाची सत्ता हिसकावून घेतली आहे. त्याचा परिणाम अफगाणिस्तानातील afganistan समाजावर झाला आहे. क्रुरता, आक्रमकता, हिंसाचार यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तालिबान्यांनी सर्वसामान्यांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यावर काडीमात्र विश्वास नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या होत्या. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील सेलिब्रेटींनी आता देश सोडण्याची तयारी केली आहे.

गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानातून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या हजारांची आहे. त्यांना रोखण्यासाठी तालिबानी प्रयत्न करत आहे. मात्र काही करुन आपल्याला हा देश सोडायचाच अशी भावना नागरिकांची झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील पहिली महिला दिग्दर्शक सबा saba हिनं आपण या देशात किती मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. अथक संघर्ष करुन आपल्याला चित्रपट निर्मिती केली होती. त्याकामी आपल्या घरातूनच विरोध झाल्याचे तिनं सांगितले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील एका प्रसिद्ध गायिकेनं देश सोडल्याची बातमी समोर आली आहे. त्या गायिकेनं तालिबान्यांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तान मधील प्रख्यात पॉप गायिका अर्याना सईदनं Afghan Pop Star Aryana तो देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती काबूल वरुन अमेरिकेमध्ये गेली आहे. अफगान द वॉयस या शोची जज म्हणून अर्याना सोशल मीडियावर सर्वांना माहिती आहे. तिनं अमेरिकेच्या कार्गोनं आपला देश सोडला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यातून तिनं सध्याच्या परिस्थितीवर सडकून टीका केली आहे. तिनं लिहिलं आहे की, आतापर्यत खूप काही सहन केलं आहे. त्या रात्री फार भयाण होत्या. आम्ही कोणत्या संकटातून गेलो आहोत याची कल्पना तुम्हाला येणार नाही. मात्र जे काही भोगलं आहे ते वेदनाकारक होतं. अशी भावना त्या गायिकेनं व्यक्त केलं आहे. त्या फोटोमध्ये अर्याननं मास्क लावल्याचे दिसून आले आहे. मी आता जेव्हा माझ्या नव्या घरी जाईल तेव्हा काही गोष्टी तुम्हाला नक्की सांगेल. असेही अर्यानानं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT