aamir and r madhavan 
मनोरंजन

'व्हायरस' पिच्छा सोडेना;  रँचोपाठोपाठ फरहानलाही कोरोना

स्वाती वेमूल

अभिनेता आमिर खानपाठोपाठ आता अभिनेता आर. माधवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. माधवनने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. आमिर आणि माधवनने 'थ्री इडियट्स' या सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं. त्याच चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो पोस्ट करत माधवनने ट्विट केलं. 'फरहानने रँचोचा पाठलाग केलाच पाहिजे आणि व्हायरस नेहमीच आमच्या मागे लागला आहे. पण यावेळी त्याने आम्हाला पकडलं', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. आता राजू याठिकाणी येऊ नये हिच आमची इच्छा आहे, असंही त्याने म्हटलंय. 'थ्री इडियट्स' चित्रपटात आमिरने रँचो, माधवनने फरहान आणि शर्मन जोशीने राजूची भूमिका साकारली होती. तर कॉलेजच्या प्राध्यापकाची भूमिका साकारणाऱ्या बोमन इराणी यांना चित्रपटात 'व्हायरस' या नावाने हाक मारायचे. याच चित्रपटाचा संदर्भ देत माधवनने हे ट्विट केलं. 

आर. माधवनचं ट्विट- 
'फरहानने रँचोचा पाठलाग केलाच पाहिजे आणि व्हायरस नेहमीच आमचा पाठलाग करत होता. पण यावेळी त्याने आम्हाला पकडलं. पण ऑल इज वेल (सर्वकाही ठीक आहे) आणि कोव्हिडवर मी लवकरच मात करेन. पण हीच अशी एक जागा आहे, जिथे राजू येऊ नये असं आम्हाला वाटतं. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद आणि माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे', असं माधवनने ट्विटरवर लिहिलं. 

याआधी आमिरला कोरोनाची लागण झाली असून तो घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. अभिनेता रोहित सराफलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत आजपर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ५,१८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुंबईत पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अलर्ट

'भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ', अन्यायापासून मुक्ती; रुग्णालयातून सोनम यांचा पहिला मेसेज

Live Updates Marathi: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्या नागपुरात शांतता मार्च, नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

Pakistan Fuel Prices: पाकिस्तानचा मोठा निर्णय! आता पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलणार; सरकारची नवी इंधन धोरण घोषणा

Locked Jaw: जांभई देताना किंवा जेवताना जबडा लॉक होतोय? स्नायू फाटण्याचा धोका! जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT