after adipurush controversy om raut take visit goa mangeshi temple  SAKAL
मनोरंजन

Om Raut Adipurush: आदीपुरुष वादानंतर ओम राऊत गोव्यातील मंगेशी मंदिरात दर्शनाला

ओम राऊत यांनी गोव्यात मंगेशी मातेचं दर्शन घेतलंय

Devendra Jadhav

Om Raut Adipurush News: ओम राऊत दिग्दर्शित आदीपुरुष सिनेमावर चहुबाजुंनी सडकुन टिका झाली. आदीपुरुष सिनेमातले संवाद, त्यातले VFX, सिनेमातले प्रसंग अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली. सिनेमावर जगभरातले प्रेक्षक नाराज झाले.

अशातच आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी गोव्यात मंगेशी मातेचं दर्शन घेतलंय. सध्या या फोटोची सोशल मिडीयावर चर्चा आहे.

(after adipurush controversy om raut take visit goa mangeshi temple)

ओम राऊत मंदिरात देवीच्या दर्शनाला

आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी देवीच्या मंदिराबाहेरचा फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करुन ओम राऊत लिहीतात..

श्री मंगेशी मंदिर आणि श्री शांतादुर्गा मंदिरात गेल्यावर मी अनेकदा माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये जातो. ही दोन्ही पवित्र स्थळे मला माझ्या मुळाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या मंदिरांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो.

आदिपुरुषच्या लेखकाने मागितली माफी

आदिपुरुष सिनेमा चांगलाच वादग्रस्त ठरला. सिनेमा रिलीज झाल्यावर काही आठवड्यांनी आदिपुरुषचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये माफी मागुन लिहिले आहे की, 'आदिपुरुष' चित्रपटामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मी मान्य करतो.

माझ्या सर्व बंधू-भगिनी, ज्येष्ठ, आदरणीय ऋषीमुनी आणि श्री राम भक्तांची मी हात जोडून बिनशर्त माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.

आपल्या सर्वांना एक आणि अतूट राहण्याची आणि आपल्या पवित्र शाश्वत आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो!' अशी पोस्ट मनोज मुंतशीर यांनी केलीय.

आदिपुरुषचा वाद कोर्टात गेला

आदिपुरुष सिनेमाचा वाद थेट कोर्टात गेला. अलाहाबादमधील लखनऊ बेंचनं तीन दिवस आदिपुरुष खटल्यावर सुनावणी केली आहे.

पहिल्या दिवसापासून कोर्टानं वेगवेगळ्या गोष्टींवरुन आदिपुरुषच्या टीमला धारेवर धरले आहे.

चित्रपटामध्ये भगवान राम, हनुमान आणि सीता यांना ज्याप्रकारे दाखवण्यात आले आहे त्यावरुन मेकर्सला समाजात काय मेसेज द्यायचा आहे. हे त्यांनी सांगावे.

हे सगळं करुनही मेकर्स म्हणतात की हे रामायण नाही...ते प्रेक्षकांना वेड्यात तर काढत नाही ना असा प्रश्नही कोर्टानं केला आहे. आता आदिपुरुष ऑगस्टमध्ये अमॅझॉन प्राईमवर रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT