neetha shetty Instagram
मनोरंजन

BBM 3: आदिश वैद्यनंतर 'या' अभिनेत्रीची होणार वाईल्ड कार्ड एण्ट्री?

मालिकाविश्वात चर्चेत असलेलं नाव, ओळखा पाहू!

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठी ३ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. स्पर्धक त्यांच्या कामगिरीने प्रेक्षकांना प्रभावित करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. नुकतंच कॅप्टन्सीच्या कार्यादरम्यान घरातील सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला. तृप्ती देसाई यांनी जय दुधाणे, विशाल निकम आणि स्नेहा वाघ यांना त्यांच्या खेळाबद्दल फटकारलं. बिग बॉसच्या घरात आतापर्यंत एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची म्हणजेच आदिश वैद्यची एण्ट्री झाली होती. आदिशने आपल्या खेळाने प्रेक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, परंतु गेल्या आठवड्यात त्याला घराबाहेर जावं लागलं. आता आणखी एक अभिनेत्री वाईल्ड कार्ड एण्ट्री करणार असल्याचं कळतंय.

दुसऱ्या वाइल्ड कार्ड स्पर्धकाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दाखवण्यात आलेली अभिनेत्री ही नीथा शेट्टी असल्याचं म्हटलं जात आहे. नीथाने नुकतंच इंस्टाग्राम अंकाऊटवर तिचा फोटो पोस्ट करत, लवकरच काहीतरी नविन येतंय असं कॅप्शन लिहिलं आहे. हा फोटो पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी वेलकम टू मराठी बिग बॉस, आम्ही तुमची वाट बघतोय अशा कमेंट्स केल्या आहेत. वीकेंडच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकर वाईल्ड कार्ड स्पर्धकाचं स्वागत करतील.

नीथा शेट्टी हिने अनेक मराठी आणि हिंदी टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. तिने 'तुम बिन जाने कहां', 'रात होने को है', 'कहीं तो होगा', 'घर की लक्ष्मी बेटियाँ', 'बनू में तेरी दुल्हन', 'ममता', 'सीआयडी', 'पेशवा बाजीराव', 'मेरी हनीकारक बीवी', 'लाल इश्क' अशा हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तर ती 'फुगे' आणि 'तुला कळणार नाही' या चित्रपटांमध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Puri: जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर घारींचा थवा; स्थानिकांनी ओळखला धोक्याचा इशारा, 'ती' भविष्यवाणी...

Google Search: सकाळच्या वेळी लोक प्रामुख्याने 'या' 8 गोष्टी करतात सर्च? यादी वाचून येईल चक्कर

Latest Marathi News Live Update: फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का कारवाई

विराट कोहलीपेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल जास्त Google Search केलं, कसं वाटतंय? Vaibhav Suryavanshi ने दिलेल्या उत्तराची चर्चा…

Dhurandhar Movie Location: धुरंधर चित्रपटाची लोकेशन करा एक्सप्लोर आणि बजेटमध्ये ट्रिपचा अनुभव घ्या...

SCROLL FOR NEXT