After Alia Bhatt viral video netizens reacts on her and Ranbir Kapoor's relationship  Esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor Trolled: आलियानं रणबीर बद्दल असं काय सांगितलं की नेटकऱ्यांनी घेतला क्लास? व्हिडिओ व्हायरल

आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यानंतर रणबीर कपूरला ट्रोल केले जात आहे.

Vaishali Patil

Alia Bhatt Video Viral: बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे नाव घेतले जाते. दोघेही नेहमी चर्चेत असतात. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नेहमीच त्यांच्या मुलाखतीत पार्टनर विषयी बोलत असतात.

आलिया तर पती रणबीर कपूरबद्दल नेहमी बोलतांना दिसते. बऱ्याचवेळा हे कपल त्यांच्या वागणुकीमुळे ट्रोल देखील होत असते. आता पुन्हा एकदा आलियानं असं वक्तव्य केलं की रणबीर पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे.

आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यानंतर रणबीर कपूरला ट्रोल केले जात आहे. आलियाने अलीकडेच व्होगला एक मुलाखत दिली. ज्यात तिने स्किन केअर रूटीन शेअर केलं आहे.

या व्हिडिओदरम्यान आलियाने सांगितले की, रणबीरला तिने लिपस्टिक लावणं मुळिच आवडत नाही. व्हिडिओमध्ये आलिया बोलते की रणबीरला तिनं लिपस्टिक लावलेलं आवडत नाही. त्यामुळे तो तिला लिपस्टिक पुसायला लावतो. याच कारणामुळे आलिया न्यूड शेड्स लिपस्टिक लावते. बॉयफ्रेंड असतानाही तो आलियाला तिची लिपस्टिक पुसायला सांगायचा.

मात्र रणबीरचं असं वागणं नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. त्यांनी रणबीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तो आलियाला कंट्रोल करतो. एकानं लिहिलयं की, ही नेहमीच रणबीरच्या धाकात असते. तर दुसऱ्याने लिहिलं की, ती ज्या प्रकारे रणबीरबद्दल बोलत राहते, त्यावरून असं दिसतं की ती मदतीसाठी विनंती करत असते. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आलिया शेवटची रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसली होती. त्याचबरोबर तिने हॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. तर रणबीर लवकरच रश्मिका मंदान्नासोबत 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT