kartik-Aryan 
मनोरंजन

'कार्तिक आर्यनविरोधात खरंच काहीतरी शिजतंय'; बॉलिवूडचा एक गट पाठिशी

अनुभव सिन्हानंतर अपूर्व आसरानीने कार्तिकसाठी केलं ट्विट

स्वाती वेमूल

दिग्दर्शक अनुभव सिन्हा Anubhav Sinha यांनी अभिनेता कार्तिक आर्यनसाठी Kartik Aaryan ट्विट केल्यानंतर आता लेखक अपूर्व आसरानीनेही Apurva Asrani त्याला पाठिंबा दिला आहे. इंडस्ट्रीत कार्तिकविरोधात खरंच काहीतरी शिजत असल्याचे संकेत या दोघांनी दिले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच कार्तिकला इंडस्ट्रीत वेगळी वागणूक मिळत असल्याचं अपूर्वने म्हटलंय. गेल्या काही दिवसांत कार्तिक आर्यनला दोन चित्रपटांमधून अचानक काढून टाकण्यात आलं. यानंतर काही चित्रपट निर्मात्यांकडून कार्तिकवर निशाणा साधण्यात येत असल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. मात्र या सर्व प्रकरणात कार्तिक आर्यनने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. (After Anubhav Sinha Apurva Asrani tweets about campaign against Kartik Aaryan)

अनुभव सिन्हा यांच्या ट्विटला उत्तर देत अपूर्व आसरानीने लिहिलं, 'कार्तिक आर्यनविरोधातील जाणीवपूर्वक मोहिमेबद्दल भाष्य केल्याबद्दल मी अनुभव सिन्हा यांचा आदर करतो. वर्षभरापूर्वी मी सुशांत सिंह राजपूतविरोधात होणाऱ्या घटनांवर लिहिलं होतं. त्यामुळे मला अनेक पत्रकारांनी ब्लॅकलिस्ट केलं होतं. आता चांगल्यासाठी काहीतरी बदल होतोय असं मला वाटतंय.'

काय म्हणाले अनुभव सिन्हा?

'जेव्हा निर्माते अभिनेत्याला काढून टाकतात किंवा अभिनेता निर्मात्यांसोबत काम करणं सोडतो, तेव्हा याबद्दल बोललं जात नाही. हे नेहमी होत असतं. कार्तिक आर्यनविरोधातील या मोहिमेची मला चिंता वाटू लागली आहे. हे खूपच अयोग्य असून त्याने बाळगलेल्या मौनाचा मी आदर करतो', असं ट्विट अनुभव यांनी केलं होतं. अभिनेत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याविषयी निर्माते बोलत नाही, असं त्यांनी म्हटलं. आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपटातून कार्तिकला काढून टाकण्यात आल्याच्या चर्चांनंतर त्यांनी हे ट्विट केलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

'अनप्रोफेशनल' वागणुकीमुळे कार्तिकला 'दोस्ताना २'मधून काढून टाकण्यात आल्याच्या सर्वांत आधी चर्चा सुरू झाल्या. नंतर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने चित्रपटातील कलाकार पुन्हा निवडणार असल्याचं स्पष्ट केलं. या चित्रपटात कार्तिक हा जान्हवी कपूर आणि लक्ष्य यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार होता. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. मात्र नंतर कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे शूटिंग थांबवण्यात आलं. याचदरम्यान कार्तिकने शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट निर्मित 'फ्रिडी' या चित्रपटाची ऑफर स्विकारली होती. मात्र यातूनही त्याला काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT