sonalee gurav, sonalee gurav news, sonalee gurav obscene video, gautami patil
sonalee gurav, sonalee gurav news, sonalee gurav obscene video, gautami patil SAKAL
मनोरंजन

Sonalee Gurav: गौतमी पाटील नंतर इंस्टा क्वीन सोनालीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल.. धक्कादायक प्रकार उघडकीस

Devendra Jadhav

Sonalee Gurav obscene video Viral: इन्स्टा क्वीन सोनाली गुरवचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सोनाली गुरवला मॉर्फ करून तिचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

सोनालीने याप्रकरणी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलाय. सोनालीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून खुलासा केलाय.

(After Gautami Patil, Insta queen Sonalee gurav obscene video went viral.. Shocking revelations)

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सोनाली म्हणाली.. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ विडीओ सध्या वायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली.

पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. हि घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या.

सोनाली पुढे लिहिते.. सगळं काही छान सुरु असताना एखाद वादळ येऊन सगळं उध्वस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या.

लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? हि वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत.

या काळात मानसिक अवस्था कशी होती हे सांगताना सोनाली लिहिते.. मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं. आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटत.

पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या.

पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्यांना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. अशी पोस्ट लिहून सोनालीने पोलीस प्रशासन आणि कुटुंब - मित्रांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT