after reviews of saaho taran adarsh getting trolled  
मनोरंजन

'साहो'मुळे सोशल मीडियावर 'ही' व्यक्ती होतेय ट्रोल!

वृत्तसंस्था

मुंबई : बहुप्रतिक्षित 'साहो' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. UAE मध्ये पार पडलेल्या प्रीमिअर शोनंतर 'साहो' विषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु समोर आले होते. त्यानंतर भारतात प्रदर्शित होताना लोकांचा प्रतिसाद कसा असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अॅक्शनपॅक असलेल्या या चित्रपटाविषयी रिव्ह्यू आता समोर येत आहे. चित्रपटामध्ये भव्य़ दिव्य़ अॅक्शन आणि स्टंट यांनी भरपूर असला तरी मात्र कथा आणि पटकथा यांच्यावर कमी भर दिल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. चित्रपट रिव्ह्यु देणारा तरण आदर्श यामुळेच ट्विटरवर सध्या चांगलाच ट्रोल होतोय. 

तरण आदर्शने ट्विटरवरून 'साहो' चित्रपट चांगला नसल्याबाबतचं ट्विट केलं आहे. त्याने ट्विट करताना लिहिलं," #वन वर्ड रिव्ह्यु... 'साहो' असह्य. रेटिंग: 1/2. टॅलेंट, पैसा आणि संधी यांचं प्रचंड नुकसान... कमजोर कथा, गोंधळवणारी पटकथा हौशी दिग्दर्शन". 

यामुळे संतापलेल्या नेटकऱ्य़ांनी तरणने दिलेल्या रिव्ह्युवरुन त्याला चांगलच ट्रोल केलं. या चित्रपटाविषयी पक्षपातीपणा करत तरणने जाणूनबुजून चुकीचा रिव्ह्यू दिल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. तो पैसे घेऊन चित्रपटाचं प्रक्षेपण करतो, असे अनेक गंभीर आरोपही अनेकांनी यावेळी केले. तरणने यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची तुलना करत तो कसा सोईस्कर रिव्ह्यू देतो, असे ट्विट अनेकांनी केले. 

या सर्व आरोपांनंतरही अद्याप तरणने यावर आपलं कोणतचं मत व्यक्त केलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील हस्तक्षेप भोवला, पोलिस अधीक्षक तुषार दोषींसह १०० पोलिसांच्या निलंबनाचे आदेश

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघात विदर्भाच्या पठ्ठ्याला मिळाली संधी; 'या' टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या जागेवर खेळणार

Mumbai Sipahi Recruitment: शिपायाच्या ८८७ जागांसाठी २ लाख १४ हजार अर्ज; मुंबई उच्च न्यायालयातील भरतीमधील धक्कादायक स्थिती, बेरोजगारीचे वास्तव!

Niphad News : 'केस कापायला नेतो' सांगून घराबाहेर पडले, अन काळजाचा थरकाप उडवणारी बातमी आली; निफाडमधील हृदयद्रावक घटना

Farsawale Baba: कोण होते 'फरसा वाले बाबा'? त्यांच्या ४०० गायींचं काय होणार? योगी सरकारने घेतला मोठा निर्णय, दोषींवर कारवाई

SCROLL FOR NEXT