riya chakraborty on sushant
riya chakraborty on sushant 
मनोरंजन

सुशांतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीने लिहिली पोस्ट, म्हणाली 'आता तु देखील त्या चमचमत्या ता-यांपैकी एक आहेस.. '

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. सुशांतच्या जवळचे लोक आणि त्याचे चाहते त्याला अजुनही विसरु शकत नाहीयेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांच्यानंतर आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील सुशांतच्या आठवणीत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. रियाने सोशल साईटवर तिच्या मनातील सुशांत बद्दलच्या भावना व्यक्त करुन त्याला श्रद्धांजली दिली आहे. 

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांतच्या निधनानंतर अनेकांच्या रागाचा सामना करत आहे. सुशांतचे चाहते रियाला त्याच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवत आहेत. या सगळ्यांनतर आज रियाने सुशांतच्या आत्महत्येला एक महिना होताच स्वतः भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा आणि सुशांतचा एक सुंदर फोटो पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रियाने लिहिलंय, 'मी आजपर्यंत माझ्या भावनांचा सामना करायला घाबरत आहे. माझ्या मनात एकटेपणाची भावना निर्माण झाली आहे. एक तु होतास ज्याच्यामुळे मला प्रेम आणि त्याच्यात ताकदीचं महत्व जाणवलं. तु मला सांगितलंस की कसं गणिताच्या एका समीकरणाने आयुष्याचा अर्थ कळू शकतो. मी वचन देते की तुझ्याकडून हे दरदिवशी शिकत राहिन. मी कधीच हे स्विकारु शकत नाही की तु इथे नाहीयेस.'

सुशांतविषयी रियाने पुढे लिहिलंय की, 'मला माहित आहे की तु आता जास्त शांत ठिकाणी आहेस. चंद्र, तारे, आकाशगंगा हे सगळे एका सगळ्यात महान वैज्ञानिकाचं मोठ्या मनाने स्वागत करत असतील. आता तु देखील त्या चमचमत्या ता-यांपैकी एक आहेस.. माझा शूटींग स्टार मी तुझी वाट पाहेन आणि प्रार्थना करेन की तु माझ्या जवळ परत यावास.'

रिया लिहिते, 'एक सुंदर व्यक्ती जसा असावा तु अगदी तसाच होतास. सगळ्यात मोठा अजुबा जो या जगाने पाहिला. माझे शब्द आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कमी पडत आहेत. माझ्या मते तुझं देखील हेच म्हणणं होतं जेव्हा तु म्हणाला होतास की आपलं प्रेम हे आपल्या दोघांपेक्षाही खूप जास्त आहे. तु प्रत्येक गोष्टीवर खुलेपणाने प्रेम केलंस. आणि आता तु मला हेही दाखवून दिलंस की आपलं प्रेम खरोखरंच खूप जास्त आहे. तुझ्या आत्म्याला शांती लाभो सुशी. तुला गमवल्यावर आज ३० दिवस झाले मात्र संपूर्ण आयुष्य मी तुझ्यावर प्रेम करेन.'

after one month of sushant singh rajput demise rhea chakraborty pens an emotional note 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT