Tiger 3 Katrina Kaif Towel Fight Scene Morphed: Esakal
मनोरंजन

Katrina Kaif: रश्मिकानंतर कतरिना कैफच्या फोटोशी छेडछाड! टॉवेल फाईट सीनचा फेक फोटो व्हायरल

Vaishali Patil

Tiger 3 Katrina Kaif Towel Fight Scene Morphed:  साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही सध्या चर्चेत आली आहे तिच्या एका मॉर्फ व्हिडिओमुळे. रश्मिका 'डीपफेक' व्हिडिओ समोर आला आहे. अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर येताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

खुद्द रश्मिकापासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत व्हिडिओ एडिट करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. हे प्रकरण ताजे असतानाच आता अणखी एका अभिनेत्रीच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची स्टार कतरिना कैफ.

कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी सिनेमा 'टायगर 3' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाण्यांमुळे हा अॅक्शन ड्रामा मोस्ट अवेटेड झाला आहे. 'टायगर 3' या चित्रपटात कतरिनाचा टॉवेल फाईट सीन दाखवण्यात आला आहे.

सध्या हा सीनही खुप चर्चेत आहे. आता कतरिनाच्या या व्हिडिओमधील फोटोला एडिट करुन छेडछाड करुन हा फोटो सोशल मिडियावर शेयर करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा फोटो शेयर करुन चित्रपटाबाबत नकारात्मकता पसरवण्यात येत आहे.

आधी रश्मिका आणि आता कतरिनाचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते खुपच संतापले आहेत. सायबर क्राईमद्वारे हे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणाऱ्यावर कडक कारवाही करण्याची ते करत आहेत.

चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यापासूनच कतरिनाचा तो टॉवेल सीन खुप चर्चेत होता. हा सीन कसा शुट झाला याबाबत कतरिनाने प्रतिक्रियाही दिली होती. ती म्हणाली होती, "मला पडद्यावर अॅक्शन सीन करायला आवडतात आणि टायगर फ्रँचायझीने मला नेहमीच महिला अॅक्शन हिरोईन बनण्याची संधी दिली आहे" तिने एक पोस्टही शेयर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT