After 'Saalar', Prabhas' new movie announced, the rebel star will be seen in a unique look director maruthi SAKAL
मनोरंजन

Prabhas New Movie: 'सालार'नंतर प्रभासच्या नवीन सिनेमाची घोषणा, अनोख्या लूकमध्ये दिसणार रिबेल स्टार

प्रभासच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Prabhas New Movie Announcement: प्रभास स्टारर 'सालार: पार्ट 1-सीझफायर' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाने आतापर्यंत जागतिक स्तरावर 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता प्रभास त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीकडे वळला आहे. आगामी चित्रपटासाठी प्रभास दिग्दर्शक मारुतीसोबत काम करत आहे.

चित्रपटाचे एक कॉन्सेप्ट पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. पोस्टर पाहून प्रभासच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला आहे.

प्रभासच्या आगामी सिनेमाचे पोस्टर शुक्रवारी रिलीज करण्यात आले, ज्याचे नाव 'राजा डिलक्स' असल्याचे सांगितले जात आहे. पोंगलच्या दिवशी प्रभासचा नवा अवतार समोर येणार असल्याचेही पोस्टरमधून दिसतंय.

X वर दिग्दर्शक मारुतीने लिहिले, 'उत्साही! खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतो. रिबेल स्टार प्रभासला अगदी नवीन लूकमध्ये सादर करताना आनंद होत आहे. पोंगलच्या दिवशी तुम्हा सर्वांना भेटू."

रंगीत स्टाईलचं पोस्टर

प्रभासच्या आगामी सिनेमाचे पोस्टर रंगीबेरंगी आहे. प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार'च्या विरुद्ध हे पोस्टर आहे.

प्रभासच्या आगामी सिनेमाचं पोस्टर पाहता रिबेल स्टार या चित्रपटाद्वारे हिंसाचारायुक्त सिनेमांतून ब्रेक घेत असल्याचे दिसते. प्रभास रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे.

त्यामुळे प्रभासच्या या आगामी सिनेमाची खुप चर्चा आहे.

प्रभासचा वर्कफ्रंट

दरम्यान, प्रभास नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की AD2898' मध्येही काम करत आहे. या साय-फाय चित्रपटात दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. सालारमुळे प्रभासच्या अपयशाची गाडी पुन्हा रुळावर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT