after vaalvi paresh mokashi Aatmapamphlet movie teaser out now  SAKAL
मनोरंजन

Aatmapamphlet Teaser: वाळवीच्या दिग्दर्शकाचा नवीन सिनेमा, किशोरवयीन मुलांच्या प्रेमाची गंमतीशीर गोष्ट 'आत्मपॅम्फ्लेट'

वाळवी नंतर परेश मोकाशींच्या नव्या सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Aatmapamphlet News: २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच वाळवी सिनेमा आला अन् प्रचंड गाजला. माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर वाळवीने चांगलंच यश मिळवलं. परेश मोकाशी यांनी वाळवीचं दिग्दर्शन केलं होतं.

वाळवी नंतर परेश मोकाशी नवीन सिनेमा घेऊन येणार आहेत. हा सिनेमा म्हणजे 'आत्मपॅम्फ्लेट'. ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या 'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाचे टिझर नुकतेच प्रदर्शित झाले असून हे भन्नाट टिझर आहे. ‘वाळवी’च्या भव्य यशानंतर परेश मोकाशी पुन्हा एकदा एक नवीन लेखन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

(after vaalvi paresh mokashi Aatmapamphlet movie teaser out now)

आत्मपॅम्फ्लेट प्रकरण काय? कोणते कलाकार साकारणार सिनेमात भुमिका?

'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाचे नाव वेगळे आहे. आता या नावात काय दडलंय याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळेल. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित 'आत्मपॅम्फ्लेट'चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाशी अनेक नामवंत नावे जोडली गेली आहेत.

आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. परेश मोकाशींनी हा सिनेमा लिहीला आहे.

बालपणीची रोलर कोस्टर राईड म्हणजे आत्मपॅम्फ्लेट

दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, "चित्रपटाचे नाव असे का आहे, ते टिझरमध्ये स्पष्ट कळत आहे. खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनाच्या काळात झाले होते. त्याचबरोबर इतर असंख्य आव्हानं असतानाही चित्रपटाच्या टीमने मनापासून काम केले आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे. याचे सारे श्रेय संपूर्ण टीमचे आहे. 'आत्मपॅम्फ्लेट'मधील पात्रांपैकी एखादे पात्र तरी बालपणी आपल्यात, आपल्या मित्र मैत्रिणीत दडल्याचे प्रेक्षकांना जाणवेल. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे.''

आत्मपॅम्फ्लेट सिनेमाची रिलीज डेट?

चित्रपटाचे लेखक परेश मोकाशी म्हणतात, 'आत्मपॅम्फ्लेट म्हणजे आपल्या शालेय आयुष्यात, क्वचितच येऊन गेलेला सोप्पा पेपर आहे. आपल्यासारख्या छोटुकल्या लोकांच्या चरित्रातील ही टीन ऐजची पाने तशी खूप खळबळजनक असतात. त्या वयात आपल्या मनात, जनात, कुटुंबात, देशात खळबळच खळबळ उडालेली आपल्याला दिसत असते. या खळबळीचा हा निखळ आनंद देणारा खेळ!''

आत्मपॅम्फ्लेट हा सिनेमा ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT