after Vishakha Subhedar shared new video audience asked her you come back in maharashtrachi hasya jatra? sakal
मनोरंजन

Vishakha Subhedar: विशाखा पुन्हा हास्यजत्रेत? त्या व्हिडिओनं वाढवली उत्सुकता..

व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले पुन्हा हास्यजत्रेत दिसणार का?.. विशाखाने गेला गौप्यस्फोट..

नीलेश अडसूळ

vishakha subhedar: गेली कित्येक वर्ष 'फू बाई फू', 'हास्य जत्रा' अशा कार्यक्रमातून तर नाटक आणि चित्रपटातून आपलं मनोरंजन करणारी, आपल्याला हसवणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा आणि विनोद हे समिरकरण प्रेक्षकांच्या मनावर कायमच रुंजी घालते.

काही महिन्यांपूर्वीच विशाखाने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला रामराम करून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या ती 'स्टार प्रवाह' वरील 'शुभविवाह' या मालिकेत आत्याबाईच्या भूमिकेत दिसत आहे. पण प्रेक्षक मात्र विशाखाला अजूनही हास्यजत्रेत पाहण्यासाठी आतुर आहेत.

नुकताच विशाखाने एक व्हिडिओ शेयर केला, जो पाहून विशाखा हास्यजत्रेत परतली की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

विशाखा सुभेदार सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिच्या बऱ्याच रील्स व्हायरल होत असतात. आयुष्यातील अनेक सुख-दुख, प्रसंग ती शेयर करत असते. आज असाच एक व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. जो पाहून, चर्चेला उधाण आले आहे.

या व्हिडिओ मध्ये विशाखा शॉर्ट केस आणि काहीशा वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. जणू हे हास्य जत्रेतील स्किटच आहे. सोबत विशाखा एक डायलॉग घेऊन म्हणते, ''मोका सबको मिलता है..'' त्यामुळे हा व्हिडिओ आता चर्चेचा विषय झाला आहे.

विशाखा तु हास्यजत्रेत पुन्हा परतलीस का?, असा प्रश्न तिला अनेकांनी विचारला आहे. एवढेच नाही तर एका चाहतीने थेटच विचारले की तू 'हास्यजत्रेत कधी परतणार?' त्यावर विशाखाने उत्तर दिले, 'नाही, आता वेगळा प्रोजेक्ट हातात आहे. तुम्ही माझी नवी मालिका पहा. ”

सोबतच चाहत्यांनी आम्ही तुला खूप मिस करत आहोत, अजूनही तु दिसशील या आशेने हास्यजत्रा पाहतो, तुझ्या सारखं बाबू कुणीच बोलू शकत नाही, अशा कमेंट चाहत्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT