ashutosh patki and Tejashree Pradhan Instagram
मनोरंजन

'बबड्या'चा तेजश्री प्रधानला खास सल्ला; 'भूतकाळ विसर कारण..'

तेजश्रीसाठी आशुतोषने लिहिली पोस्ट

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' Aggabai Sasubai ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत सोहम ऊर्फ बबड्याची भूमिका साकारणारा आशुतोष पत्की Ashutosh Patki घराघरात पोहोचला. अभिनेत्री तेजश्री प्रधानने Tejashri Pradhan ऑनस्क्रीन आशुतोषच्या पत्नीची भूमिका साकारली होती. आता तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त आशुतोषने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. (aggabai sasubai fame ashutosh patki gave special tips to tejashri pradhan )

आशुतोष पत्कीची पोस्ट-

'माझी प्रिय मैत्रीण, मला तुला हे सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि आपली मैत्री मी कायम जपेन. माझी नेहमीच साथ दिल्याबद्दल, मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि एक अभिनेता, एक माणूस म्हणून मला घडण्यास मदत केल्याबद्दल तुझे खूप आभार. या वाढदिवशी मी तुला दोन टिप्स देणार आहे. सर्वांत पहिलं म्हणजे, भूतकाळ विसर कारण ते तू बदलू शकत नाहीस आणि दुसरं म्हणजे प्रेझेंट (भेटवस्तू) विसर, कारण मी तुला देऊ शकलो नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा', अशी पोस्ट आशुतोषने लिहिली आहे.

मालिकेच्या शूटिंगदरम्यान तेजश्री आणि आशुतोष यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. दोघांच्या आवडीनिवडीसुद्धा सारख्याच असल्याने मैत्री करण्यासाठी त्यांना फार वेळ लागला नाही. मालिका सध्या बंद झाली असली तरी शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांना अजूनही लक्षात आहे. आशुतोषच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT