nivedita saraf 
मनोरंजन

'प्रेमळ आई बनली खाष्ट सासूबाई'; सोशल मीडियावर आसावरीच्या नवीन लूकची जोरदार चर्चा

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका आता नव्या रुपात आणि नव्या नावाने प्रदर्शित झाली आहे. 'अग्गंबाई सूनबाई' असं या नवीन मालिकेचं नाव असून यातील काही भूमिकासुद्धा बदलल्या आहेत. ही नवीन मालिका सोमवारपासून (१५ मार्च) सुरू झाली. पहिल्या एपिसोडची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होतीच. मालिका प्रसारित होताच सोशल मीडियावर त्याविषयी कमेंट्स येऊ लागल्या होत्या. नव्या मालिकेत आसावरीची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्यांचा मालिकेतील नवीन लूक पाहायला मिळत असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. मालिकेतील आसावरीची एंट्री खूपच छान होती, अशा शब्दांत काहींनी कौतुक केलंय. 

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत प्रेमळ आईची भूमिका साकारणारी आसावरी आता 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत खाष्ट सासूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. निवेदिता यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये त्यांनी गुलाबी रंगाच्या कुर्त्यावर हिरव्या रंगाचा कोट परिधान केला आहे. नेटकऱ्यांनी स्टाइलिश लूक अशी प्रतिक्रिया दिली आहे. या नवीन मालिकेत अभिजीत आणि आसावरी यांच्या भूमिकेत बराच बदल झालेला दिसतोय. तर शुभ्राच्या भूमिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधानऐवजी उमा पेंढारकर दिसतेय. बबड्याची भूमिका साकारणाऱ्या आशुतोष पत्कीचीही मालिकेतून गच्छंती झाली आहे. आता मालिकेत बबड्याची भूमिका अभिनेता अद्वैत दादरकर साकारतोय. 

नवीन मालिकेत बरंच काही बदललं आहे. शुभ्रा आता बबडूची अर्थात तिच्या मुलाची काळजी घेण्यात मग्न झाली आहे. तर आसावरी पूर्ण कंपनीचा भार सांभाळत आहेत. अभिजीत राजे घर सांभाळण्यात शुभ्राची मदत करत आहेत. या नवीन कथेला आता प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र पहिल्याच एपिसोडमध्ये निवेदिता सराफ यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली हे नक्की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT