ahan shetty Sakal
मनोरंजन

Ahan Shetty: सुनील शेट्टीचा मुलगा अहान गर्लफ्रेंडसोबत झाला रोमँटिक, फोटो व्हायरल

वर्षानुवर्षे एकमेकांना डेट करत असलेले अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

Aishwarya Musale

अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टी क्वचितच लाइम लाइटमध्ये राहतो. पण, आता त्याचे लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अहान त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत स्पॉट झाला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोघे नुकतेच मॉडेल सोफिया रिची आणि इलियट ग्रेंज यांच्या लग्नाच्या पार्टीत सहभागी झाले होते.

तानिया श्रॉफने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर लग्नाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये वधू-वरांसोबत ती अहानसोबत पोज देताना दिसत आहे. दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. अहानची बहीण आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीनेही या फोटोंवर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफचे व्हायरल झालेले फोटो तुम्ही पाहू शकता. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. एका फोटोमध्ये अहानने त्याच्या लेडी लव्हला तिच्या गालावर किस केले आहे. या लव्ह बर्ड्सच्या फोटोंवर अथिया व्यतिरिक्त सर्व स्टार्सनी आपल्या प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांच्या नात्याचा खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तानियाने अहानसोबतचे अनेक खास क्षण तिच्या हँडलवर शेअर केले आहेत. काही लोकांना वाटते की तानिया ही जॅकी श्रॉफची मुलगी आहे. मात्र, हे सत्य नाही. तानिया फॅशन डिझायनर आहे. अहान आणि तानिया लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. 2015 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृत टॅग दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सकाळी डोळे उघडले, नोकरी गेल्याच्या मेलचे नोटिफिकेशन दिसले; मेटात 8 हजार कर्मचारी कपातीला सुरुवात

Shivraj Motegaonkar Viral Video : पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या... शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल

Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, तब्बल ४४९ जणांचा बळी

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा

‘जशी स्वामींची इच्छा!’ गश्मीर महाजनी देऊळ बंद 2 मध्ये दिसणार? मोहन जोशी म्हणाले...'सगळे राघव शास्त्रीबद्दल...'

SCROLL FOR NEXT