मनोरंजन

मन्नतबाहेर हनुमान चालिसाचे पठण, बैल आणि 'स्टे स्ट्राँग, प्रिन्स आर्यन'

एक जण बैल घेऊन 'मन्नत'च्या बाहेर उभा आहे.

दीनानाथ परब

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानची (Aryan khan) आता थोड्याचवेळात तुरुंगातून सुटका होईल. ड्रग्ज प्रकरणात NCB च्या अटकेत असलेल्या आर्यनला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने (court) जामीन मंजूर केला. काल जामिनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्याची सुटका होईल. आर्यनच्या जामिनामुळे शाहरुख चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आर्यन घरी येणार म्हणून मन्नतवर रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेर चाहते मोठ्या संख्येने जमले आहेत. एक जण बैल घेऊन 'मन्नत'च्या बाहेर उभा आहे. 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे शाहरुखच्या गाजलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील गाणं वाजवत आहे.

'स्टे स्ट्राँग, प्रिन्स आर्यन' असा हातात फलक घेऊन काही चाहते उभे आहेत. एका बाबाने तर आर्यनसाठी मन्नत बाहेर 'हनुमान चालिसा'चे पठण केले. सध्या आर्थर रोड कारागृहाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. कारागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. शाहरुख सकाळी वरळीच्या फोर सिझन हॉटेलमध्ये होता. मुलाला नेण्यासाठी तो आर्थर रोड कारागृहात येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT