remo ahmad khan 
मनोरंजन

अहमद खानने दिले कोरिओग्राफर रेमो डिसूजाचे हेल्थ अपडेट्स

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. “डॉक्टरांनी रेमोची अँजिओग्राफी केली असून पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत”, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेलने दिली होती. आता रेमोचा खास मित्र आणि कोरिओग्राफर अहमद खान याने त्याचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत.

अहमद खान यांनी ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रेमोचे हेल्थ अपडेट देताना सांगितलं की, “रेमोला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचं मला फोनवर सांगण्यात आलं होतं. आम्ही सगळे काळजीत होतो मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे.” हेल्थ आणि फिटनेसच्या बाबतीत जागरुक राहणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका यावा याबाबत अहमदने खर तर आश्चर्य व्यक्त केलं आहे. “जो व्यक्ती त्याच्या हेल्थ आणि फिटनेसबद्दल इतकी काळजी घेतो त्याच्यासोबत असं घडावं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासालाच मोठा धक्का बसतो” अशा शब्दांत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रेमो सध्या आयसीयूमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रेमोने अनेक गाण्यांची कोरिओग्राफी करण्याव्यतिरिक्त त्याने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या सिनेमांंचं दिग्दर्शन केलं आहे. ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिऍलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून होता. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी शोमधून रेमोचं नाव घराघरात पोहोचलं.

कुल आणि शांत स्वभावाचा परिक्षक म्हणून रेमोला ओळखलं जातं. टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत त्याने या शोमध्ये परीक्षकाची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. नंतर याच रिऍलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासाठी रेमो काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला. 

ahmed khan opens up on choreographer remo d souza shares health update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT