Sushant Singh Rajput Video Viral\ Sushant Singh Doppelganger  Esakal
मनोरंजन

Sushant Singh Doppelganger: 'सुशांत बदला घ्यायला परत आला ', तो व्हिडिओ पाहिल्यानंतर राखीची प्रतिक्रिया...

Vaishali Patil

Sushant Singh Rajput Video Viral:  बॉलिवूडचा दिंवगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा या जगात नाही. त्याने 2020 मध्ये त्याच्या वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. तो जाऊन तीन वर्ष झाले असले तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याचे स्थान अजूनही कायम आहे.

आजही त्याचे चाहते त्याला फॉलो करतात. त्याच्या सोशल मिडियावरील फॉलोवर्सची संख्या कमी झालेली नाही.

एका टिव्ही शो मध्ये काम करत करियची सुरुवात करणारा सुशांत बॉलिवूडचा टॉप अभिनेता बनला होता.

त्यातच सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामधील व्यक्ती हुबेहूब सुशांत सारखीच दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.

तो सुशांतच असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातच आता राखी सांवतनं देखील या व्हिडिओवर अशी काही प्रतिक्रिया दिली की त्यांची चर्चा रंगली.

सुशांतच्या मृत्यूनंतर राखीने वारंवार त्याच्यासाठी न्यायाची मागणी केली होती. ती आजही सुशांतला मिस करते. तिच्या बऱ्याच व्हिडिओतही ती सुशांतबद्दल बोलली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सुशांत सिंग राजपूतच्या लूक लाइकचा एक व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला.

आता या व्हायरल व्हिडिओतील व्यक्ति पाहिल्यानंतर राखीला देखील तोच सुशांतच असल्याचा भास झाला. इन्स्टाग्रामवरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना राखी सावंतने कमेंट केली की, 'तो बदला घेण्यासाठी परत आला आहे, कर्मा.'

Rakhi sawant

सुशांतच्या लुकलाइकचे नाव डोनिम अयान आहे आणि तो सुशांतसारखाच दिसतो. काही व्हिडिओंमध्ये अयान हुबेहुब सुशांतसारखा दिसत आहे. सुशांतची स्माईल आणि हेअरस्टाईल पाहून कोणीही फसू शकतं. इंस्टाग्रामवर या मुलाचा व्हिडिओ पाहून सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्याच्या चाहत्यांना तर सुशांतला पाहिल्यासारखेच वाटले. तर काहींनी सुशांत परत आल्याचं देखील लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT