aishwarya narkar support husband avinash narkar from trolling SAKAL
मनोरंजन

Aishwarya Narkar - Avinash Narkar: "तुम्ही त्यांना वाईट बोलता तेव्हा..." ऐश्वर्या नारकर यांनी व्यक्त केली मनातली खंत

अविनाश नारकर यांना ट्रोल करणाऱ्यांना माणसांसाठी ऐश्वर्या नारकर यांचा खास व्हिडीओ

Devendra Jadhav

Aishwarya Narkar - Avinash Narkar News: अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही चर्चेत आहेत.

अविनाश नारकर सोशल मीडियावर डान्स रिल्स बनवत असतात. त्यावरुन त्यांना अनेकदा ट्रोलही केलं जातं. यावेळी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांना सपोर्ट करताना दिसतात. ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर एक रील शेअर करुन मनातली खंत व्यक्त केलीय.

(aishwarya narkar support husband avinash narkar from trolling)

ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर एक रील शुट केलाय. या रील व्हिडीओत अविनाश - ऐश्वर्या दोघेही रोमँटीक अंदाजात दिसत आहेत. हा रील पोस्ट करुन ऐश्वर्या यांनी कॅप्शनमध्ये लिहीलंय की, सदैव पाठिंबा देणारं आणि काळजी घेणारं कुटुंब दिल्याबद्दल मी सदैव ऋणी आहे... हा माणुस माझ्या आयुष्यात आहे ज्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते"

ऐश्वर्या पुढे म्हणतात, "हा 'माणूस' केवळ स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत नाही तर त्यासोबतच आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा गरजूंची जबाबदारीही आनंदाने घेतो... हे नक्कीच सोपे नाही...

जेव्हा लोकं त्याला ट्रोल करतात तेव्हा मला मनापासून वाटते की तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे हे एखाद्याला समजले पाहिजे..... हा एकदम हॅपी गो लकी माणूस आहे.. तुम्ही प्रत्येक जीवाचा आदर करा मग तो कोणीही असो....❤️❤️ अविनाश तू एक हिरा आहेस !!!...सदैव असाच राहा."

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे प्रत्येक वेळी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात, पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात. दोघांचे डान्स रील्स व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत झळकत आहेत. तर अविनाश नारकर सन मराठीवरील कन्यादान मालिकेत झळकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT