Aishwarya Rai-Bachchan Cannes Film Festival 2022 look Google
मनोरंजन

कान्सच्या रेडकार्पेटवर ऐश्वर्याचं काय चुकलं? का केलं जातंय ट्रोल?

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ब्लॅक फ्लोरल गाऊन घालून ऐश्वर्यानं आपल्या सौंदर्यानं अनेकांना घायाळ केलं.

प्रणाली मोरे

विश्वसुंदरी म्हणून जगभरातील चाहत्यांचं आपल्या सौंदर्यानं नेहमी मन जिंकणारी ऐश्वर्या राय-बच्चन(Aishwarya Rai-Bachchan) ही दरवर्षी कान्स फेस्टिव्हलला(Cannes Film Festival) उपस्थित राहते. आणि त्या-त्या वर्षी तिच्या सौंदर्यांनं आणि स्टायलिश ड्रेसनं उपस्थितांची मनं जिंकते. यावर्षी देखील फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर तिनं आपल्या अदाकारीनं तिथं असलेल्या प्रत्येकाला घायाळ केलं. ब्लॅक फ्लोरल गाऊन विथ न्यूड मेकअप या तिच्या लूकची जादू यंदाही कान्स फेस्टिव्हलमध्ये पहायला मिळाली. दीपिका पदूकोण,तमन्ना भाटिया सारख्या बॉलीवूडच्या देखण्या अभिनेत्रींनीही कान्सच्या रेड कार्पेटची शान वाढवली. ऐश्वर्याचे आतापर्यंत दोन लूक आपल्या समोर आले आहेत.

पहिल्या लूकमध्ये ऐश्वर्या राय बच्चननं गुलाबी रंगाचा सूट घातला होता. तिनं त्यावर पायातही मॅचिंग गुलाबी रंगाची हिल घातली होती. यावेळी रेड कार्पेटसाठी ऐश्वर्या राय बच्चननं ब्लॅक फ्लोरल गाऊनचं सिलेक्शन केलं होतं,त्यावर तिनं न्यूड मेकअप करणं पसंत केलं . ऐश्वर्याचा हा गाऊन अनेक कारणांनी खास ठरला. या गाऊनच्या फ्रंट साइडला प्लंज नेकलाइन दिसून आली. तर उजव्या बाजूला खूप सारी रंगबिरंगी फूलं लावली होती. तर डाव्या बाजूला खांद्यावर फुलांचा डोलारा शोभून दिसत होता.

या काळ्या रंगाच्या गाऊनसोबत ऐश्वर्यानं आपला लूक खूप सिंपल ठेवला होता. तिनं अगदी नेमका मेकअप केलेला दिसला. केसांना थोडंसं बांधून एक छोटासा क्लीप फक्त लावला होता. फोटोग्राफर्सना तिनं खूप पोझेस दिल्या. रेड कार्पेटवर तिनं फोटोसाठी दिलेल्या खास स्माईलनं अनेकांची मनं जिंकली. पण असं असलं तरी तिचा मेकअप अनेकांना खटकला. आता लोकं काय मेकअप जास्त झाला तरी नावं ठेवतातच की पण ऐश्वर्याला मेकअप कमी केल्यानं म्हणे नावं ठेवली जात आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून लोकांनी तिला थोडा अधिक चांगला मेकअप करायचे सल्ले दिले आहेत.

१८ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये भारतीय पव्हेलियनचं उद्धाटन देखील पार पडलं. दीपिका पदूकोणसोबत केंद्रिय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त फेस्टिव्हल मध्ये आतापर्यंत आर.माधवन,ए.आर.रहमान,पूजा हेगडे,तमन्ना भाटिया,उर्वशी रौतेला,नावाझुद्दिन सिद्दिकी उपस्थित राहिलेले नजरेस पडले आहेत. १७ मे ते २८ मे पर्यंत सुरु राहणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून दर दिवशी कलरफुल हॅपनिंग समोर येत राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT