कंगना रनौतचा Controversy पासून दूर राहण्याचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं Kangana ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

कंगना रनौतचा Controversy पासून दूर राहण्याचा मोठा निर्णय, कारणही सांगितलं

गेल्या काही दिवसांत तुम्ही कंगना रनौत(Kangana ranaut) च्या वागण्या-बोलण्यातील खास गोष्टीचं निरिक्षण केलं आहे का? थोडं वेगळं जाणवतंय काही. ती कुठल्याही वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. चला,तिनं स्वतःच याविषयी सांगितलं आहे. ब़लीवूड क्वीन कंगनानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करीत सगळ्यांनाच एका गोष्टीची आठवण करून दिली आहे. २० मे रोजी कंगनाचा 'धाकड'(Dhaakad) सिनेमा प्रदर्शित होत आहे. पण इतके प्रमोशनल कार्यक्रम सिनेमाचे झाले तरीही अद्याप एकही Controversy नाही. चला,जाणून घेऊया कंगनाच्या शांत बसण्यामागचं,कोणंतही वादग्रस्त विधान न करण्यामागचं कारण.

हेही वाचा: 'राज कुंद्रा चेहरा झाकून का फिरतो?' शिल्पा शेट्टी काय म्हणाली पहा...

कंगना रनौतचा सिनेमा प्रदर्शनाआधी नेहमीच चर्चेत असतो. परंतु यावेळी धाकड सिनेमाचं प्रमोशन खूप शांत पद्धतीनं पार पडलं. कंगनानं सिनेमासंदर्भात अनेक मुलाखती दिल्या आहेत,पण असं कोणतंही वादग्रस्त विधान या दरम्यान केलं नाही ज्यावरनं मोठी चर्चा होईल. यासंदर्भात सांगतानाच कंगनानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 'जाड असो किंवा बारीक लोकं बोलणारच', सोनाक्षी असं का म्हणाली?

कंगना म्हणालीय,''मित्रांनो नमस्कार,तुम्ही सगळे टेन्शनमध्ये आला आहात ना. कंगना एवढ्या सगळ्या मुलाखती देत आहे. पण अजूनही काहीच controversy नाही. कोणताच मसाला हिनं दिला नाही की काही एंटरटेन्मेंट होईल असं खाद्य मिळत नाही कंगनाकडून. काही तोड-फोड होताना दिसत नाही. काही वाद-भांडणं नाहीत. मी तुम्हाला एकच सांगते. भांडणं,वाद,मारा-मारी सगळं पहायला मिळेल पण फक्त मोठ्या पडद्यावर. ते देखील बिग बजेट,अॅक्शन,थ्रिलर सगळं 'धाकड' स्टाईलमध्ये. आता बुकिंग सुरू आहे. २० मे ला तोड-फोड ,अॅक्शन-थ्रिलरनी भरलेला 'धाकड' मोठ्या पडद्यावर पहा''.

हेही वाचा: 'कुणी म्हणतं हिरवे कुणी म्हणे निळे', ऐश्वर्यानं सांगितला डोळ्यांचा खरा रंग

कंगना रनौतच्या या व्हिडीओमुळे आता स्पष्ट झालं आहे की, अभिनेत्री आता कॉन्ट्रोव्हर्सीमुळे नाही तर आपल्या सिनेमातून लोकांना 'धाकड' स्टाईल दाखवणार आहे. 'धाकड' सिनेमात दिव्या दत्ता,अर्जुन रामपालही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन रजनीश घईनं केलेलं आहे. ़

Web Title: Kangana Ranaut Speaks On Controversy Dhaakad Actress Post Video On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top